पणजी, वाळपईतील मतदारांसाठी २३ रोजी सुटी

0
89

गोवा सरकारने पणजी आणि वाळपई विधानसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीच्या मतदाना दिवशी दि. २३ ऑगस्ट रोजी पणजी आणि वाळपई मतदारसंघातील कार्यालयांसाठी सार्वजनिक सुटी जाहीर केली आहे.
तसेच पणजी आणि वाळपई मतदारसंघातील मतदार असलेले सरकारी कर्मचारी, औद्योगिक कर्मचारी, सरकारी आणि औद्योगिक रोजंदारीवरील कर्मचारी, खाजगी व्यावसायिक आणि औद्योगिक कर्मचारी, खाजगी आस्थापनांतील सर्व कर्मचारी आणि विविध व्यवसाय, व्यापार आणि उद्योगात काम करणार्‍या रोजंदारीवरील कामगारांसाठी ही सुटी भरपगारी सुटी असेल.
प्रसार माध्यम देखरेख समिती
दरम्यान, भारतीय निवडणूक आयोगाने पोटनिवडणूक काळात राजकीय पक्ष, उमेदवार आणि कार्यकर्त्यांकडून टीव्ही चॅनल्स आणि केबलवरून प्रसारित होणार्‍या जाहिराती तसेच पेडन्युजवर देखरेख ठेवण्यासाठी जिल्हा पातळीवर मिडिया सर्टीफिकेशन आणि देखरेख समितीची स्थापना केली आहे. राज्य पातळीवरील या समितीत मुख्य निर्वाचन अधिकारी हे अध्यक्ष आहेत तर निवडणूक आयोगाने नियुक्त केलेले निरीक्षक आणि आल्तिनो येथील आकाशवाणीचे केंद्र संचालक, स्वतंत्र नागरिक आणि पत्रकार सदस्य आहेत. अतिरिक्त-संयुक्त सीईओ सदस्य सचिव आहेत.