भारताचा पराभवाने प्रारंभ

0
109

फिबा आशिया चषक बास्केटबॉल स्पर्धेच्या आपल्या पहिल्या सामन्यात भारताला इराणकडून १०१-५४ असा मानहानीकारक पराभव पत्करावा लागला. इराणकडून माजी एनबीए खेळाडू हमाद हद्दादी याने २० गुण व ८ सहाय्य अशी भरीव कामगिरी करताना भारतीयांना संधी दिली नाही. इराणकडून हद्दादी व्यतिरिक्त जमशिदी जाफराबादी (१८), काझेमी (१०), सहाकियान (१६) व माशायेकी (१६) यांनी हद्दादीला सुरेख साथ दिली. भारताकडून अमज्योत गिल याने सर्वाधिक १० गुण प्राप्त केले. भारताचा पुढील सामना आज जॉर्डनशी होणार आहे.