स्वीस बँकेतील खात्यांची माहिती उघड होणार

0
217

ज्या भारतीय नागरिकांनी स्वीस बँकेतील आपल्या खात्यांमध्ये प्रचंड प्रमाणात पैसा ठेवला आहे त्यांची माहिती भारत सरकारला मिळणे आता एका कारणामुळे शक्य होणार आहे. अशा माहितीच्या देवाण-घेवाणीविषयीचा करार झाला असल्याने स्वीस बँकेतील भारतीय खाते धारकांची गोपनीय माहिती भारत सरकारला मिळणार आहे.
अशा खात्याविषयीची माहिती सातत्याने स्वित्झर्लंड सरकार भारताला देणार आहे. या अनुषंगाने उभय देशांदरम्यान करार झालेला असल्याचे काळा पैसा दडवून ठेवलेल्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण होणार आहे. स्वित्झर्लंड सरकारने जारी केलेल्या या विषयीच्या अधिसूचनेत तसा तपशील अहवाल सादर करण्यात आला आहे. ऑटोमॅटिक एकस्चेंज ऑफ इन्फोर्मेशन असे या कराराचे नाव आहे. त्यावर स्वित्झर्लंड सरकारने मोहोर उठवली आहे.
स्वित्झर्लंडव्यतिरिक्त भारताने अन्य ४० देशांबरोबर अशा माहितीसाठी आदानप्रदान करण्याचे करार केले आहेत. या करारांनुसार भारतीयांची बँक खाती, त्यांची नावे व अन्य महत्त्वाचा तपशील भारताला मिळणार आहेत. भारतीयांची कोणती खाती स्वीस बँकेत आहेत, त्यात किती रक्कम आहे, हा पैसा बाळगणारे खातेदार कोण याची माहिती भारत सरकारला मिळणार आहे.
भारतीयांचा काळा पैसा बँकांमधून भारतात परत आणण्याची चर्चा सुरू होती. विद्यमान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तसेच आश्‍वासनही दिले होते.