सीआयआय गोवा परिषदेकडून शिखा पांडेचा सत्कार

0
153

कॉन्फेडरेशन ऑफ इंडियन इंडस्ट्री (वेस्टर्न रिजन)च्या गोवा राज्य परिषदेतर्फे आयसीसी विश्वचषक महिला क्रिकेट स्पर्धेतील उपविजेत्या भारतीय संघाचे प्रतिनिधीत्व करताना चकमकदार कामगिरी केलेल्या गोव्याच्या शिखा पांडेचा धेंपो उद्योग समूहाचे अध्यक्ष तथा सीआयआय (डल्बूआर) स्पोटर्‌‌स इनिशिएटिव्सचे चेअमरन श्रीनिवास धेंपो यांच्याहस्ते सत्कार करण्यात आला.
नुकत्याच इंग्लंडमध्ये झालेल्या आयसीसी महिला विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत भारतीय संघाला उपविजेतेदावर समाधान मानावे लागले होते. परंतु या स्पर्धेती भारतीय संघाने चमकदार कामगिरी आपला मोलाचा वाटा उचलताना शिखाने उपयुक्त योगदान दिले होते. दक्षिण आफ्रिका, ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या सामन्यांत तिने महत्त्चपूर्ण बळी मिळविले होते. दिलीप सरदेसाई यांच्यानंतर राष्ट्रीय संघाचे प्रतिनिधीत्व करणारी ती गोव्याची पहिली खेळाडू ठरली आहे. यापूर्वी तिने आयसीसी टी -२० महिला विश्वचषक स्पर्धेतही भारतीय संघाचे प्रतिनिधीत्व केले होते. तिच्या या उज्ज्वल यशामुळे कॉन्फेडरेशन ऑफ इंडियन इंडस्ट्री (वेस्टर्न रिजन)च्या गोवा राज्य परिषदेतर्फे तिचा सत्कार करण्यात आला. विशेष म्हणजे वायुसेनेत फ्लाइट लेफ्टनंट म्हणून कार्यरत असलेल्या शिखाचा एअर चीफ मार्शल धनोआ यांनी मंगळवारी सेना मुख्यालयात प्रशस्तीपत्र देऊन गौरव केला होता.