फ्रान्सिसला अधिकाधिक शिक्षेसाठी प्रयत्न करणार

0
109

>> सर्व गुन्हे परेरानेच केल्याचा मुख्यमंत्र्यांचा दावा

राज्यातील अनेक धार्मिक प्रतिकांची विटंबना तसेच दफनभूमीतही तोडफोडप्रकरणी पोलिसांच्या ताब्यात असलेल्या आरोपी फ्रान्सिस परेरा याला अधिकाधिक शिक्षा व्हावी यासाठी सरकारचे प्रयत्न असतील, असे निवेदन मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी काल विधानसभेत केले. विरोधी पक्षनेते चंद्रकांत कवळेकर व प्रतापसिंह राणे यांच्या लक्षवेधी सूचनेवर त्यांनी हे निवेदन केले.
राज्यातील धार्मिक प्रतिकांच्या तोडफोडप्रकरणी अटक केलेला फ्रान्सिस परेरा याने १४ वर्षांच्या काळात अशी ११३ कृत्ये केली. खूनप्रकरणी तुरुंगात असताना तेथील इस्त्रायली कैद्यांनी त्याचे ‘ब्रेनवॉशिंग’ करून क्रॉस, थडगे यामध्ये मानवी आत्मे तळमळत असल्याचे मनावर बिंबविण्यात आले, असे पर्रीकर यांनी सांगितले.
परेराने तुरुंगातून सुटका झाल्याच्या दिवशीच आपल्या घरातील आल्तार पाडला होता. तो पूर्ण शाकाहारी आहे. वरील मोडतोड करण्याच्या बाबतीत तो सक्षम असून या कृत्यांसाठी त्याने कुणालाही बरोबर घेतले नाही. बरोबर घेतले असते तर कोणीही मद्यप्राशन करून कुठेही माहिती उघड करेल याची त्याला भीती होती, असे परेरानेच पोलिसांना सांगितले आहे. त्याला गजांआड करण्यासाठी पोलिसांनी आधुनिक तंत्रज्ञानाचाही वापर केल्याचे ते म्हणाले. पणजीतील आबा दे फारिया व अन्य पुतळे पाडण्याचाही त्याचा विचार होता, असे पर्रीकर यांनी सांगितले. या लक्षवेधी सूचनेवर चर्चा चालू असताना, रवी नाईक, दिगंबर कामत, आलेक्स रेजिनाल्ड कॉरेन्स, विरोधी नेते बाबू कवळेकर यांनी एकच व्यक्ती इतके गुन्हे करीत असल्याचे ऐकून संशय व प्रश्‍नचिन्ह निर्माण होत आहे, असे सांगून परेरा याला आणखी कोणाची फूस आहे, याचीही चौकशी करण्याची मागणी त्यांनी केली.
यावेळी पर्रीकर यांनी प्रत्येकाची ताकद व शैली वेगळी असते, असे सांगून वरील सर्व गुन्हे परेरा यांनेच केले आहेत, असे स्पष्ट केले. पोलीस सर्व दृष्टीकोनातून पुढील चौकशी करतील, असेही त्यांनी सांगितले. मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या उत्तरानंतर यापुढे अशा प्रकारांची पुनरावृत्ती होणार नाही,

त्या’ परिपत्रकात
आवश्यक दुरुस्ती करणार
आमदारांच्या कार्यालयात सरकारी अधिकार्‍यांना बोलावण्यास बंदी घालण्याच्या वादग्रस्त परिपत्रकात आवश्यक ती सुधारणा करून आमदारांची अडचण होणार नाही, याची काळजी घेण्याचे आश्‍वासन मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी काल विधानसभेत दिले.
विरोधी नेते चंद्रकांत कवळेकर व अन्य कॉंग्रेस आमदारांनी आणलेल्या लक्षवेधी सुचनेवर पर्रीकर यांनी अधिकार्‍यांना पुन्हा पुन्हा घरी बोलावू नका, अशी विनंतीही केली. काल सकाळी विधानसभेत कामकाजाच्या सुरूवातीसच सभापती डॉ. प्रमोद सावंत यांनी परिपत्रकाच्या विषयावर मुख्यमंत्री, विरोधी नेते व अन्य आमदारांची बैठक झाल्याचे सांगून पर्रीकर लक्षवेधी सुचनेच्यावेळी सर्वकाही सांगतील, असे सांगून प्रश्‍नोत्तराचा तास घेऊया, असे स्पष्ट केले.