राष्ट्रपतीपदाचा फैसला आज होणार

0
46

भारताचे नवे राष्ट्रपती कोण याचा फैसला आज संध्याकाळी ५ वा. पर्यंत होणार आहे. नुकत्याच पार पडलेल्या राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीची मतमोजणी आज सकाळी ११ वा. सुरू होणार आहे. एनडीएचे रामनाथ कोविंद व विरोधी पक्षाच्या उमेदवार मीरा कुमार या पदासाठी दावेदार आहेत.
मतमोजणीच्या प्रारंभी संसदेतील मतपेटी उघडून मतमोजणी होणार आहे. त्यानंतर राज्यांमधून आलेल्या मतपेट्या राज्यांच्या आद्याक्षरानुसार उघडल्या जाणार आहेत, अशी माहिती लोकसभेचे महासचिव अनुप मिश्रा यांनी दिली. चार वेगवेगळ्या टेबलांवर ही मतमोजणी आठ फेर्‍यांद्वारे होणार आहे. सर्वसाधारपणे या मतमोजणीचा निकाल संध्या. ५ वा. जाहीर केला जातो असे निवडणूक आयोगाच्या एका वरिष्ठ अधिकार्‍याने सांगितले.