वंध्यत्व

0
417

– डॉ. स्वाती अणवेकर

स्त्रीला वंध्यत्व का येते याची बरीच कारणे आहेत. त्यात मानसिक, शारीरिक व भावनिक कारणांचा प्रामुख्याने समावेश होतो. साधारणपणे स्त्रीची मासिक पाळी सुरू झाल्यावर वीस ते पंचेवीस या कालावधीत त्या स्त्रीची प्रजननक्षमता उत्तम असते. पण जसजसे वय वाढते तशी ती कमकुवत होत जाते व पस्तीशीनंतर तर ती अत्यंत क्षीण होते.

सुरदा व सुरेश यांचे लग्न होऊन आता पाच वर्षे झाली होती. लग्नानंतर एका वर्षातच सुरदाला दिवस गेले व त्यांना त्यांचा पहिला मुलगा चिरायू झाला. आता तो तीन वर्षांचा झाला. तसे पाहता सुरदा व सुरेश या दोघांचे लग्न वयाच्या तिशीनंतरच झाले होते. पहिल्या मुलानंतर आता मात्र जेव्हा दोघेही दुसर्‍या अपत्याकरिता प्रयत्न करत होते तेव्हा मात्र त्यांच्या प्रयत्नांना यश येत नव्हते. शेवटी न राहावून त्यांनी एका आयुर्वेदिक स्त्री-रोगतज्ज्ञाचा सल्ला घेण्याचे ठरवले. सर्व तपासण्या झाल्या आणि त्यात सुरदाला वंध्यत्व आले असल्याचे सिद्ध झाले. वैद्यांनी त्यावर उपचार सुरू केले आणि एका वर्षानंतर सुरदा गरोदर राहिली व तिने एका गोंडस मुलीला जन्म दिला.
वंध्यत्व ही समस्या आता आपल्या देशातील जनतेला देखील भेडसावत आहे. मग ह्याला स्त्री व पुरुष दोघेही अपवाद नाहीत. सध्या आपल्या देशात तीस लाख दांपत्ये अपत्यविरहित आहेत आणि हे असेच सुरू राहिले तर हा आकडा नक्कीच वाढेल यात शंका नाही. त्यातदेखील एखाद्या स्त्रीला मूल झाले नाहीतर समाजाचा तिच्याकडे पाहण्याचा दृष्टीकोन अजूनदेखील बदलत नाही हे कटू सत्य आहे. म्हणूनच स्त्रियांमधील वंध्यत्वाची कारणे व त्यासंबंधी सखोल माहिती आपण या लेखामार्फत जाणून घेऊया.
वंध्यत्व म्हणजे नेमके काय?-
– यामध्ये दोन भाग आहेत. १. प्राथमिक वंध्यत्व – यात लग्न होऊन एक वर्षांपेक्षा जास्त काळ असुरक्षित संबंध करून देखील जेव्हा त्या स्त्रीला गर्भधारणा होत नाही.
२. सेकंडरी वंध्यत्व – यात त्या दांपत्याला पहिले अपत्य होते पण नंतर मात्र त्या स्त्रीला गर्भधारणा होत नाही.
वंध्यत्वाची कारणे –
स्त्रीला वंध्यत्व का येते याची बरीच कारणे आहेत. त्यात मानसिक, शारीरिक व भावनिक कारणांचा प्रामुख्याने समावेश होतो. साधारणपणे स्त्रीची मासिक पाळी सुरू झाल्यावर वीस ते पंचेवीस या कालावधीत त्या स्त्रीची प्रजननक्षमता उत्तम असते. पण जसजसे वय वाढते तशी ती कमकुवत होत जाते व पस्तीशीनंतर तर ती अत्यंत क्षीण होते.
स्त्रीला वंध्यत्व का येऊ शकते? –
– फलीत स्त्रीबीज अथवा गर्भ हा गर्भाशय भिंतीला चिकटला की तो जिवंत राहू शकत नाही.
– फलीत स्त्रीबीज हे गर्भाशयाच्या भींतिला चिकटून राहात नाही.
– बरेचदा पक्व स्त्रीबीज हे गर्भाशयातून ओव्हरीमध्ये पोहोचत नाही.
– ओव्हरीमधून ओव्ह्युलेशन न होणे.
वरील सर्व कारणांमुळे त्या स्त्रीला गर्भधारणा होत नाही. तर हे असे होण्यामागेदेखील अनेक कारणे असतात.
भाग १ – अतिव्यायाम किंवा व्यायामाचा अभाव
– अतिबैठे काम करणे
– मानसिक तणाव
– दांपत्यामधील प्रेम व भावनिक ओलाव्याचा अभाव
– दारू, सिगारेट, तंबाखु इ.चे व्यसन
– कुपोषण
– रात्री जागरण
– मल-मुत्रादी वेगांचे धारण करणे
– वारंवार घेण्यात येणार्‍या गर्भनिरोधक गोळ्या.
– वाढलेले वय.
भाग २ – ओबेसिटी किंवा अतिस्थूलता
– पीसीओडी
– डायबेटीस
– एंडोंेमेट्रियोसिस
– मासिक पाळीच्या वेळी ओव्ह्युलेशन न होणे
– हायपो अथवा हायपरथायरॉइडिझम
– गर्भाशयातील विकृती
– ओव्हरीमधील सीस्ट अथवा ट्यूमर
– गर्भाशयातील ट्यूमर
– पीआयडी
– हॉर्मोनल इम्बॅलन्स
– कर्करोगावर घेतलेले उपचार
– टॉर्च इन्फेक्शन
या सर्व कारणांमुळे स्त्रीला वंध्यत्व येते.
क्रमशः