सायटिका

0
360

– वैदू भरत म. नाईक (कोलगाव)

वातविकारात ढोबळ मानाने दोन प्रकार पडतात. रस, रक्त, मांस इत्यादी धातूंचा क्षय झाल्यामुळे वात वाढतो. तसेच वाताच्या सर्व तर्‍हेच्या कार्यात स्रोतातील अडथळ्यामुळे वहन क्रिया बिघडून नवनवीन वातविकार उत्पन्न होतात. सायटिका हा विकार दुसर्‍या प्रकारात मोडतो. या विकाराच्या कळा, तीव्र वेदना सुरू होतात तेव्हा काही बोलता सोय नाही, इतका रोगी त्रास भोगतो. तीव्र वेदनांच्या सायटिकास शास्त्रात खली म्हणतात. आगंतुक कारणांप्रमाणे आमनिर्मिती हे एक प्रमुख कारण सायटिका विकारात आहे, असा अनुभव आहे.
कारणे ः
१. अग्निमांद्य असताना पचावयास जड, थंड, स्राव निर्माण करणारे पदार्थ अधिक प्रमाणात खाणे.
२. अजीर्ण, अपचन, आमांश या विकारांचा पुनःपुनः प्रादुर्भाव होणे.
३. कोणत्या तरी एका पायाच्या, पाठीखालच्या, कमरेच्या भागावर अकारण ताण, आधार, मार यामुळे शीर दबणे.
४. मोटारची किक मारताना पाय सटकणे, दीर्घकाळ ताकदीच्या बाहेर वजन उचलणे.
५. मलावरोध, परसाकडे चिटक व दुर्गंधी येणे, शौचास जोर करावा लागणे.
लक्षणे ः
* प्रथम कंबरेपासून तीव्र वेदना, ताठरणे सुरू होणे.
* क्रमाक्रमाने पाठ, मांड्या, पोटरी व शेवटी टाचेपर्यंत वेदना, ताठरणे, कंप, टोचल्यासारखी पीडा सुरू होणे.
* मलावरोध, चिकट परसाकडे होणे, भूक नसणे, अरुची उत्पन्न होणे.
* डोळ्यासमोर झापड येणे, तोंडाला पाणी सुटणे, अवयव जखडल्यासारखे वाटणे.
* आमवातासारखी इतर लक्षणे होणे.
पथ्यापथ्य ः
१) थंड, खूप जड, गोडे, तेलकट, तुपकट पदार्थ कटाक्षाने टाळावेत.
२) पोटात वायू धरेल असे पदार्थ – शेव भाजी, चिवडा, डालडा, कलिंगड, काकडी, बटाटा, कोल्ड्रिंक, आईस्क्रीम कटाक्षाने टाळावे.
३) गरम पाणी प्यावे, त्यात सुंठ टाकून घेतल्यास अधिक चांगले.
४) जोवणात ओवा चावून खावा.
५) अंगावर गरम कपडे असावे, गादी नको, फळी झोपावयास असली तर उत्तमच.
शरीर परीक्षण ः
दुखल्या जागेचे परीक्षण सुजेकरता करावे. विशेषतः कमरेत, पाठीच्या खाली, नेमकी सूज असते. जीभ व पोट मलावरोध व चिकटपणाकरता तपासावे. इतिहासात आमवात, आमांश आगंतुक आघात आहेत का याची चौकशी करावी.
उपचारांची दिशा ः
गरम पाण्याच्या पिशवीने शेकणे, गुळाचा दाट लेप लावणे, तव्याने शेकणे, पूर्ण विश्रांती घेणे, पाठीवर झोपणे, या उपचारांनी बरे वाटते का ते पहावे. स्कूटर व इतर वाहन चालविल्यामुळे आराम पडतो का ते पहावे.
अनुभविक उपचार ः
१) हिनादगुगुळ, लक्षादीगुगुळ, वातगजांकुश प्रत्येकी तीन-तीन गोळ्या दोन वेळा रिकाम्या पोटी गरम पाण्याबरोबर बारीक करून घेणे.
२) एरंडेल तेल एक चमचा, एक चपाती करत असताना मोहन म्हणून वापरणे व अशा पोळ्या खाव्यात.
३) गवती चहा अकट महानारायण तेल चार भाग असे मिश्रणाचे मसाज अधिक प्रभावी आहे. त्याशिवाय सहचरतेल, महाविषगर्भ, शतावरी सिद्ध तेल, मोहरीचे तेल किंवा तिळतेल वापरावे.
४) लेप – गोळ्यांच्या ऐवजी आंबेहळद, तुरटी, रक्तरोडा, सुंठी, मोहरी, गुगळ यापैकी मिळेल तो दाट लेप लावावा.
५) एरंडतेल गोमुत्राबरोबर नित्य प्यावे.