पेल्व्हिक इन्फ्लेमेटरी डिसीज

0
143

– डॉ. स्वाती अणवेकर

पीआयडी म्हणजे स्त्रियांच्या प्रजननाच्या अवयवाचा संसर्ग. हे सर्वात तीव्र संक्रमण असून यात स्त्रीच्या ओटीपोटातील अर्थात कंबरेच्या भागात असणार्‍या अवयवांना इंफेक्शनची लागण होते.
कॉपर-टी बसविताना, ऍबोर्शन करत असताना, प्रसुतीच्या वेळी किंवा शस्त्रक्रिया करताना निर्जंतुकीकरणाची योग्य काळजी घेतली गेली नाही तर त्या स्त्रीला झखऊ ची लागण होऊ शकते.

वसुधा साधारणतः तीस ते पस्तीस वयोगटाची गृहिणी, हल्ली काही दिवस सारखे तिच्या ओटीपोटात व कंबरेत दुखायचे व अंगावरून दुर्गंधीयुक्त स्त्राव जायचा. तिने स्वतः बरेच घरगुती उपचार करून पाहिले. पण इतके उपचार करून देखील काहीच उपयोग न झाल्याने तिने तिच्या नवर्‍याला सांगितले व त्याने ताबडतोब तिला स्त्रीरोग तज्ज्ञाकडे घेऊन गेले असता तिच्या बर्‍याच तपासण्या केल्या गेल्यानंतर वसुधाला झखऊ असल्याचे सांगितले. डॉक्टरांनी तिला काही दक्षता पाळायची ते सांगून औषधे लिहून दिली व काही घाबरण्याचे कारण नाही असे सांगितले.
झखऊ म्हणजे नक्की काय ते आपण समजून घेऊया –

पीआयडी म्हणजे स्त्रियांच्या प्रजननाच्या अवयवाचा संसर्ग. हे सर्वात तीव्र संक्रमण असून यात स्त्रीच्या ओटीपोटातील अर्थात कंबरेच्या भागात असणार्‍या अवयवांना इंफेक्शनची लागण होते. तसेच स्त्रीच्या प्रजनन संस्थेला देखील यापासून धोका पोहचू शकतो. याचा प्रसार असुरक्षित शरीर संबंधातून देखील होतो. याची लागण जर प्रजनन संस्थेतील प्रमुख अवयव जसे ओव्हरी, फॅलोपीयन ट्युब्स किंवा गर्भाशय यांना झाली तर त्यामुळे त्या अवयवांना कायमची हानी होऊ शकते.
झखऊ ची कारणे –
* अशा पुरुषासोबत शरीर संबंध करणे ज्याला सिफीलीस, गोनोरिया यासारखे गुप्तांग रोगाची लागण झाली असेल तर त्या स्त्रीला लगेच गर्भाशयमुखाला इंफेक्शन होऊन झखऊ होऊ शकतो.
* कॉपर-टी बसविताना, ऍबोर्शन करत असताना, प्रसुतीच्या वेळी किंवा शस्त्रक्रिया करताना निर्जंतुकीकरणाची योग्य काळजी घेतली गेली नाही तर त्या स्त्रीला झखऊ ची लागण होऊ शकते.
झखऊ ची लक्षणे –
* योनीमार्फत हिरवा पिवळसर दुर्गंधीयुक्त स्त्राव जाणे.
* ओटीपोटात अथवा पोटात दुखणे.
* पाठीत वेदना होणे.
* सर्व शरीरात कणकण जाणवणे.
* लघवी करताना वेदना होेणे.
* लघवी करताना जळजळ होणे.
* शरीर संबंध करताना वेदना होणे.
* थंडी वाजून ताप येणे –
ही एक गंभीर अवस्था असल्याने झखऊ कशामुळे निर्माण झाला आहे त्याचे कारण पाहून त्याप्रमाणे यावर उपचार करावे लागतात.