कचर्‍यापासून निर्मित गॅसवर ऑगस्टपर्यंत बसेस धावणार

0
114

 

>> पर्रीकर यांची मडगाव येथे माहिती
>> ४०० कोटींच्या मलनिःस्सारण प्रकल्पाचे उद्घाटन

गोवा २०१९ वर्षापर्यंत कचरामुक्त करण्याचे उद्दिष्ट्य आहे. त्यासाठी साळगावच्या धर्तीवर आणखी तीन कचरा प्रकल्प उभारण्यात येणार आहेत. कचरा प्रक्रियेबरोबर प्रकल्पांतून तयार होणारी गॅस बसेससाठी वापरून येत्या ऑगस्टपर्यंत प्रायोगिक तत्त्वावर तीन बसेस सुरू करण्यात येतील, अशी माहिती मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी काल दिली.
शिरवडे, मडगाव येथील जायकाच्या ६.७ एमएलडी मलनिःस्सारण प्रक्रिया केंद्र व सांडपाणी तसेच पायाभूत विकास महामंडळातर्ङ्गे २० एमएलडी मलनिःस्सारण प्रक्रिया प्रकल्पाचे उद्घाटन केल्यानंतर श्री. पर्रीकर बोलत होते. यावेळी सार्वजनिक बांधकाममंत्री सुदिन ढवळीकर, आमदार दिगंबर कामत, आमदार लुईझिन ङ्गालेरो, माजी आमदार आवेर्तान ङ्गुर्तादो, नगराध्यक्ष डॉ. बबिता प्रभुदेसाई, मुख्य सचिव धर्मेंद्र शर्मा आदी उपस्थित होते.
२००४ साली पणजी येथे मलनिःस्सारण प्रकल्प सुरू केला. तो आजही उत्कृष्टपणे चालत असून गोव्यात आणलेले हे सर्वप्रथम तंत्रज्ञान होते. कोलवाळ येथे कचरा प्रकल्प सुरू करून कचर्‍याची ङ्गार मोठी समस्या सोडविली. त्यातून कोणतीच दुर्गंधी येत नसल्याचे सांगून अशा प्रकारचे प्रकल्प वेर्णा, काकोडा येथे सुरू करण्यात येतील. वेर्णा येथील प्रकल्पानंतर वास्को व सासष्टीतील प्रश्‍न सुटेल असे
मुख्यमंत्री म्हणाले. कचरामुक्त गोवा करण्यासाठी सरकारला विरोधी पक्षांबरोबर सर्व जनतेचे सहकार्य लागते. घरोनघर कचर्‍याचे वर्गीकरण करणे गरजेचे असून नगरसेवक, पंचांनी जागृती केली पाहिजे. लोकांमध्ये लोकशिक्षणाची गरज आहे. कचरा प्रकल्पातून तयार होणारी गॅस बसेसाठी वापरण्यात येणार असून कदंबाला देण्यात येईल. या बसेस गोव्यातच तयार करण्यात येतील, असेही त्यांनी सांगितले.
साबांखामंत्री सुदिन ढवळीकर यांनी ऑस्ट्रेलियन तंत्रज्ञानाचा वापर केलेल्या या प्रकल्पावर चारशे कोटी रुपये खर्च झाल्याचे सांगितले. नावेली येथे पश्‍चिम बगल रस्त्यावर २५ कोटी खर्च करून उड्डाण पूल बांधण्यात येणार आहे. पत्रादेवी ते बांबोळी व अडमोडपर्यंतच्या महामार्गासाठी मोडावी लागणारी घरे सरकार नव्याने बांधून देईल, अशी ग्वाही त्यांनी दिली. आमदार दिगंबर कामत यांनी हा मलनिःस्सारण प्रकल्प पूर्ण झाल्याने साळ नदी व साळपे तळ्यात सोडण्यात येणारे सांडपाणी बंद होईल. मडगाव शहरातील ९० टक्के मलनिःस्सारण वाहिनीचे काम पूर्ण झाले असून आता घरांना जोडण्या देण्यात येतील असे सांगितले. हा प्रकल्प झाल्याबद्दल आमदार लुईझिन ङ्गालेरो यांनी समाधान व्यक्त केले. यावेळी माजी मंत्री आवेर्तान ङ्गुर्तादो, नगराध्यक्ष डॉ. बबिता प्रभुदेसाई यांची भाषणे झाली.