सव्वादोन कोटी खर्चून होणार राज्यातील पुलांची तपासणी

0
102

>> लवकरच देणार कंत्राट : सुदिन ढवळीकर

राज्यातील सर्व पुलांची तपासणी सल्लागार कंपनीमार्फत करण्याचे सरकारने ठरविले असून २.३० कोटी रुपये खर्चून हे काम पूर्ण करण्यात येणार असल्याचे साबांखामंत्री सुदिन ढवळीकर यांनी काल सांगितले. जुने गोवे येथील उड्डाणपूल प्रकल्पाची मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांच्या हस्ते पायाभरणी केल्यानंतर पत्रकारांशी ते बोलत होते.
ते म्हणाले की, पुलांच्या तपासणीचे कंत्राट सल्लागार कंपनीला लवकरच देण्यात येईल. वर्षभराच्या कालावधीत सदर कंपनीला पुलांच्या तपासणीचे काम पूर्ण करण्याची अट घालण्यात येणार आहे. जे पूल धोकादायक बनले आहेत त्यांची प्राधान्य क्रमाने साबांखामार्फत केली जाईल असे ते म्हणाले. गेल्या महिन्यात दक्षिण गोव्यातील सावर्डे येथे पोर्तुगीज कालीन पूल कोसळून दोन ठार झाले होते तर ३० जणांना वाचविण्यात यश आले होते. या दुर्घटनेला तब्बल महिना लोटल्यानंतर सरकारने पुलांची तपासणी करण्याचा निर्णय घेतला आहे.