माध्यम विषय मगोने दिला सोडून ः सुदिन

0
196

शैक्षणिक माध्यम विषय जनतेने पूर्णपणे ङ्गेटाळला आहे. हा विषय आता राहिलेलाच नाही, शैक्षणिक माध्यम विषयामुळे गेल्या विधानसभा निवडणुकीत मगो पक्षाच्या सहा उमेदवारांचा पराभव झाला.
त्यामुळे मगोने हा विषय सोडून दिल्याचे सार्वजनिक बांधकाममंत्री तथा मगो नेते सुदिन ढवळीकर यांनी सांगितले.
गेल्या विधानसभा निवडणुकीच्या वेळी मगोने आपल्या जाहीरनाम्यातही या विषयाचा समावेश करणे टाळले होते, असे असले तरी त्यांनी भाजपची साथ सोडून गोवा सुरक्षा मंचबरोबर निवडणूक लढविली होती.
मगोच्या वरील भूमिकेवर भारतीय भाषा सुरक्षा मंचचे निमंत्रक प्राचार्य सुभाष वेलिंगकर यांना विचारले असता, मगोने त्याचवेळी शैक्षणिक माध्यमावर विश्‍वासघात केला होता, असे सांगितले. भाभासुमंने हा विषय सोडलेला नाही असे ते म्हणाले. विधानसभा निवडणुकीच्यावेळी मगोमध्ये अंतर्गत राजकारण काय झाले होते, याची आम्हाला कल्पना होती, असेही ते म्हणाले.