गोवा-बेळगाव महामार्गावरील वाहतूक ६ तास ठप्प

0
84

>> अनमोड घाटात ट्रेलर कलंडला

अनमोड घाटात बुधवारी सकाळी ९.३० वा. दोन व्हीललोडर घेवून जाणारा ट्रेलर संपूर्ण रस्त्यावर कलंडल्याने गोवा-बेळगाव राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक ६ तास ठप्प झाली. दोन क्रेनच्या सहाय्याने दोन्ही व्हीललोडर उतरून ट्रेलर बाजूला केल्यानंतर वाहतूक सुरळीत झाली. तत्पूर्वी बेळगावला जाणारी वाहने मोलेहून चोर्ला घाटावरून वळविण्यात आली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार एनएल-०१-डी- ११६९ क्रमांकाचा ट्रेलर गोव्याहून कर्नाटकच्या दिशेने जात होता. दुधसागर मंदिराजवळ पोचताच ट्रेलरचा जॉइंट तुटल्याने ट्रेलर संपूर्ण रस्त्यावर कलंडला. या अपघाताची माहिती
मिळताच कुळे पोलीस व ङ्गोंडा वाहतूक पोलिसांनी त्वरित धाव घेवून ट्रेलर बाजूला काढण्यासाठी दोन क्रेनची सोय केली. दोन क्रेनच्या सहायाने ट्रेलर बाजूला केल्यानंतर दु. ३.३० वा. वाहतूक पूर्वपदावर आली.
ङ्गोंडा वाहतूक पोलीस निरीक्षक राम आसरे स्थितीवर लक्ष ठेवून होते.