कर्णन यांचा जामीन अर्ज सर्वोच्च न्यायालयाने ङ्गेटाळला

0
113

>> प्रेसिडेन्सी तुरुंगात रवानगी

प. बंगाल पोलिसांनी मंगळवारी कोईमतूर येथे अटक केलेल्या कोलकाता उच्च न्यायालयाच्या माजी न्यायाधीश कर्णन यांचा जामिनासाठीचा अर्ज काल सर्वोच्च न्यायालयाने ङ्गेटाळला. त्यामुळे कर्णन यांना आता कोलकात्यामधील प्रेसिडेन्सी तुरुंगात ठेवण्यात आले आहे.
न्यायालयाच्या अवमानप्रकरणी न्या. कर्णन यांच्या अटकेचा आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिल्यानंतर काही काळ कर्णन गायब झाले होते. मंगळवारी तमिळनाडूमधील एका खाजगी कॉलेजच्या विश्रामगृहात त्यांना अटक करण्यात आली. त्यानंतर त्यांनी छातीत दुखत असल्याची तक्रार केल्यामुळे त्यांना काल तपासणीसाठी इस्पितळात नेण्यात आले. दरम्यान, कर्णन यांनी सर्वोच्च न्यायालयात केलेला जामीन अर्ज काल ङ्गेटाळण्यात आला. सहा महिने तुरुंगवासाच्या शिक्षेला स्थगिती देण्याची विनंतीही ङ्गेटाळण्यात आली. त्यांच्या शिक्षेचा आदेश काल सर्वोच्च न्यायालयाच्या सात सदस्यीय खंडपीठाने जारी केला होता. न्या. डी. वाय. चंद्रचूड व न्या. एस. के. कौल यांच्या खंडपीठाने त्यात बदल करणे शक्य नसल्याचे काल स्पष्ट केले. सध्या न्यायालयाला सुट्टी असल्याने सुट्टी संपेपर्यंत न्या. कर्णन यांना जामीन देण्यात यावा अशी विनंती त्यांचे वकील जे. नेडुम्पारा यांनी न्यायालयाला केली होती. न्या. कर्णन यांना सर्वोच्च न्यायालयाने गेल्या ९ मे रोजी शिक्षा सुनावली होती. तेव्हापासून ते अटक चुकवीत होते. मंगळवारी त्यांना ताब्यात घेण्यासाठी गेलेल्या पोलिसां विरुद्धही त्यांनी संघर्ष केला.