पाकचा विजयोत्सव साजरा करणार्‍या १५ जणांना अटक

0
94

>> मध्य प्रदेशमधील घटना

मध्य प्रदेशमधील बुर्‍हाणपूर येथील मोहाड येथे रविवारी रात्री भारत-पाकिस्तान यांच्यातील चॅम्पियन्स चषक क्रिकेट अंतिम लढतीत पाकिस्तान विजयी झाल्याबद्दल आनंदोत्सव साजरा करून पाकिस्तानच्या बाजूने घोषणा दिल्याप्रकरणी पोलिसांनी १५ जणांना अटक करून कोठडीत टाकले. त्या सर्वांवर देशद्रोहाचा गुन्हा नोंदविण्यात आला आहे. या घटनेनंतर मोहाड येथे तणाव निर्माण झाला होता.
अटक झालेल्यांनी पाकिस्तानच्या बाजूने घोषणा देत सार्वजनिक ठिकाणी ङ्गटाक्यांची आतषबाजी केली. या घटनेनंतर मोहाडमध्ये सुरक्षेत वाढ करण्यात आली. याप्रकरणी सोमवारी एका नागरिकाने पोलिसात तक्रार नोंदविल्यानंतर काल १५ जणांना अटक करण्यात आली. अटक झालेल्यांना स्थानिक न्यायालयासमोर उभे करण्यात आल्यानंतर न्यायालयाने त्यांना जामीन देण्यास नकार दिला. नंतर त्यांना खांडवा जिल्हा तुरुंगात पाठविण्यात आले. अटक झालेल १९ ते ५ वयोगटातील होते.