सरपंचावर किमान वर्षभर अविश्‍वास ठराव नको ः माविन

0
120

>> कायदा करण्याचे पंचायतमंत्र्यांचे संकेत

पंचायतींच्या गेल्या कार्यकाळात सरपंचांची पदे म्हणजे संगीत खुर्चीचा खेळ झाला होता. भविष्यकाळात अशा प्रकारांवर नियंत्रण यायला हवे. त्यासाठी किमान वर्ष किंवा दोन वर्षेपर्यंत तरी सरपंचांवर अविश्‍वास ठराव आणण्यावर बंदी घालणारा कायदा करण्याच्या विचारात असल्याचे पंचायतमंत्री माविन गुदिन्हो यांनी संकेत दिले आहेत. मात्र धक्कादायक बाब ही की जुने गोवे पंचायतीच्या सरपंचांवर अविश्‍वास ठराव दाखल करण्याच्या हालचाली सरपंच निवडणुकीच्या दुसर्‍याच दिवसांपासून सुरू झाल्या आहेत.
वारंवार सरपंचांवर अविश्‍वास ठराव आणल्याने त्याचा विकासकामांवर परिणाम होतो. त्यामुळे सरपंचांची आसने स्थिर असणे आवश्यक आहे, असे गुदिन्हो यांचे म्हणणे आहे. पंचायतमंत्री गुदिन्हो यांनी प्रत्येक पंचायतीला पंचायत घर असणे आवश्यक आहे, असे सांगून त्यासाठी प्रत्येक पंचायत मंडळाने घरासाठी प्रस्ताव सरकारला सादर करावा. वरील प्रस्तावाच्या ङ्गाईल्स ताबडतोब हातावेगळ्या केल्या जातील. त्याची जबाबदारी गुदिन्हो यांनी गटविकास अधिकारी व पंचायत सचिवांवर सोपविली आहे. पंचायत घर उभारण्यासाठी निधीचा प्रश्‍न नसल्याचे गुदिन्हो यांनी स्पष्ट केले आहे. प्रत्येक गाव कचरामुक्त झाला पाहिजे त्यासाठी प्रत्येक गावात जागृती मेळावे घेण्याची सूचनाही नव्या सरपंचांना गुदिन्हो यांनी केली आहे.