अर्जुन साळगावकर यांना अटकपूर्व जामीन मंजूर

0
74

खाण घोटाळा प्रकरणातील संशयित खाण उद्योजक अर्जुन अनिल साळगावकर यांना काल पणजी न्यायालयाने सशर्त अंतरिम अटकपूर्व जामीन मंजूर केला. अर्जावर पुढील सुनावणी होईपर्यंत साळगावकर यांना अटक न करण्याचे निर्देश पोलिसांच्या विशेष चौकशी पथकाला दिले आहे. बुधवारी साळगावकर यांची पोलीस जबानी घेण्याचे काम सुरू असताना प्रकृती बिघडल्याची त्यांनी तक्रार केल्यानंतर त्यांना गोवा वैद्यकीय महाविद्यालयात दाखल केले होते. सध्या त्यांना मणिपाल इस्पितळात दाखल केले आहे. चौकशीच्या बाबतीत एसआयटीला सहकार्य करण्यास न्यायालयाने त्यांना  सांगतले.