टेंपो अडवून सव्वादोन लाख लुटले

0
72

>> सां जुझे आरियल येथील दिवसाढवळ्या घटना

कुडाळ येथील कोंबड्या पुरवठा करणार्‍या टेंपोला दोन खुरीस, सांजुझे आरियल येथे एका कारने आलेल्या तरुणाने अडवून टेंपो चालकाकडील २.२० लाख रुपये रोख रक्कम हिसकावली व कार घेऊन फरार झाला. ही घटना काल दुपारी ११.३० वाजता घडली. पोलिसांना वाटमारी करणार्‍या कार चालकाचा पत्ता लागला असून ते त्याच्या शोधात आहेत.
कुडाळ येथील विजय भास्कर वालवलकर या कोंबड्याच्या ङ्गार्म मालकाने
नेहमीप्रमाणे काल टेंपोत कोंबड्या भरून केपे येथे पाठविल्या. ती टेंपो अक्षय दीपक देसाई चालवित होता तर आणखी दोन कामगार त्या टेंपोत होते. सकाळी केपे येथील अंबिका ङ्गार्मिंग कंपनीला कोंबड्यांचा पुरवठा करून त्या कंपनीचे मालक राम कुंकळयेकर यांनी २.२० लाख रोख चालकाकडे दिले. ते घेऊन टेंपोसहीत केपे येथे ते चहा घेण्यासाठी थांबले होते. त्यावेळी एक धडधाकट तरुण तेथे आला व चौकशी करू लागला. चहा पिऊन झाल्यावर ते परत जात असता जीए ०८ एम ८९१४ क्रमांकाच्या आल्टो कारने आलेल्या तरुणाने टेंपो दोन खुरीस येथे अडविला व चालकाला जबरदस्तीने खाली ओढून पैसे मागितले. ते न दिल्यास जीवे मारण्याची धमकी दिली. त्यावेळी टेंपोतील अन्य दोघे त्या धडधाकट माणसाला घाबरलेले होते. जीवाच्या भीतीने अक्षयने २.२० लाख रुपये दिले. त्यानंतर अक्षयने मायणा कुडतरी पोलीस स्टेशनवर तक्रार नोंदविली.
पोलिसांनी कारचा तपास केला असता तो क्रमांक बनावट निघाला. पण त्या सराईत गुन्हेगाराचा पत्ता पोलिसांना लागला असून या आधी त्याने कित्येक
वाटमार्‍या केल्याची माहिती मिळाली
आहे.