वन-मावळिंगे पंचायत क्षेत्रात लॉटरीद्वारे उमेदवार विजयी

0
205

वन – मावळिंगे पंचायत क्षेत्रातील प्रभाग ६ मध्ये विरेश गावकर व सर्वेश गावकर या दोन उमेदवारांना प्रत्येकी १०० मते पडली. सारखीच मते पडल्याने पुन्हा मतमोजणी घेण्यात आली. त्यानंतरही दोघांनाही समान मते पडल्याचे सिद्ध झाले. त्यामुळे निर्वाचन अधिकारी मधू नार्वेकर यांनी लॉटरी ड्रॉचा पर्याय ठेवला. लॉटरी काढली असता ती विरेश गावकर यांना लागल्याने ते विजयी ठरले. सासष्टी तालुक्यातील केळशी पंचायतीवर साल्वादोर फर्नांडिस लॉटरीद्वारे निवडून आले. त्यांची प्रतिस्पर्धी दीपा नाईक त्यांच्यापेक्षा एका मताने पुढे होत्या. फेरमोजणीनंतर मते समान झाल्याने लॉटरीचा अवलंब करण्यात आला.