जम्मू-काश्मीरमधील पुलवामा येथे सीमा सुरक्षा दलाच्या तळावर काल संध्याकाळी दहशतवाद्यांनी ग्रेनेड फेकले. या हल्ल्यात सीमा सुरक्षा दलाचे ९ जवान जखमी झाले असून त्यातील ३ जवानांची प्रकृती गंभीर आहे. पुलवामा जिल्ह्यातील त्राल येथे सीमा सुरक्षा दलाच्या १८० व्या तुकडीचा तळ आहे. त्या तळावर दहशतवाद्यांनी काल ग्रेनेड फेकले. या हल्ल्यात नऊ जवान जखमी झाले आहेत. या घटनेनंतर परिसरात शोधमोहीम राबवली जात असून तळावरील सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे. जखमी जवानांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.