१ जुलैपासूनच जीएसटी लागू होणार ः केंद्र सरकार

0
135

जीएसटीची अंमलबजावणी १ जुलैपासून लागू होणार असल्याचे केंद्र सरकारने काल स्पष्ट केले. यामुळे वस्तू आणि सेवा कर कायद्याच्या अंमलबजावणीवरून तर्कवितर्कांना पूर्णविराम मिळाला आहे. मोदी सरकारच्या महत्त्वाकांक्षी कायद्याची अंमलबजावणी १ जुलैपासून होणार आहे. मात्र, अंमलबजावणीची तारीख पुढे ढकलण्याची मागणी केली जात आहे. पश्‍चिम बंगालने जीएसटीची अंमलबजावणी आणखी महिनाभराने पुढे ढकलावी अशी मागणी केली आहे.