कार-दुचाकीच्या टक्करीत कुठ्ठाळी येथे युवक ठार

0
115

रविवारी रात्री उशिरा कार व दुचाकी यांच्यात झालेल्या टक्करीत दुचाकी चालक वासुदेव सज्जल गुड्डा (रा. धाकतळे, मांगूरहील, वय २२) हा युवक जागीच ठार झाला. हा अपघात कुठ्ठाळी-वास्को महामार्गावर झाला.
मिळालेल्या माहितीनुसार काल रात्री १०.३० च्या दरम्यान कुठ्ठाळी – वास्को
महामार्गावरील ङ्गाईव्ह स्टार लॉन्ड्रीजवळ पिवळी काळी वॅगनआर (क्र. जीए ०६ टी २०५३) व एव्हीएटर दुचाकी (क्र. जीए ०६ आर ३०११) या वाहनांची समोरासमोर जोरदार टक्कर झाली. त्यामुळे दुचाकीचालक वासुदेव सज्जल गुड्डा हा युवक रस्त्यावर ङ्गेकला गेला. त्याला जबर मार लागल्याने तो जागीच ठार झाला. ठोकर इतकी जबरदस्त होती यात दुचाकीचा चक्काचूर झाला. दोन्ही वाहने वास्कोच्या दिशेने येत होती.
वेर्णा पोलिसांनी या अपघाताचा पंचनामा करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात दिला.