ब्रिटनमध्ये मे यांचेच सरकार येणार

0
64

ब्रिटिश संसदेसाठीच्या सार्वत्रिक निवडणुकीचा निकाल त्रिशंकू स्थितीचा लागला असला तरी विद्यमान पंतप्रधान तेरेसा मे यांनी आपणच यापुढेही पंतप्रधानपदाची धुरा वाहणार असल्याची माहिती काल पत्रकारांना दिली. बकिंगहॅम पॅलेसमध्ये राणी एलिझाबेथ यांची भेट घेऊन परतल्यानंतर त्या पत्रकारांशी बोलत होत्या.
याआधी ठरल्याप्रमाणे आपण युरोपियन युनियनबरोबर दहा दिवसांत ब्रेक्झिट विषयावर चर्चा करणार असल्याचेही मे यांनी यावेळी स्पष्ट केले. हाऊस ऑङ्ग कॉमन्समध्ये सर्वसाधारण बहुमतासाठी आवश्यक असलेल्या ३२६ जागा मिळवण्यात अपयश आल्याने उत्तर आयर्लंडच्या डेमॉक्रेटिक युनियनिस्ट पार्टीचा (डीयूपी) पाठिंबा घेऊन मे यांचा कॉन्सर्व्हेटिव्ह पक्ष अल्पमतातील सरकार चालवणार आहे. मे यांच्या पक्षाचे ३१८ जण निवडून आले असून त्यांना डीयूपीच्या १० सदस्यांचा पाठिंबा मिळणार आहे. विरोधी लेबर पार्टीचे २६३ सदस्य निवडले आहेत. ङ्गमी पुन्हा सरकार स्थापन करणार आहे – जे स्थैर्य देऊ शकेल आणि ब्रिटनला कठीण काळात पुढे नेऊ शकेलफ असे ६० वर्षीय मे यांनी पत्रकारांना सांगितले. ब्रेक्झिटसाठी युरोपियन युनियनबरोबर १९ जूनपासून चर्चा सुरू होणार आहे.