एसीबीने समन्स पाठवूनही वीज अभियंता गैरहजर

0
68

>> वीज जोडणीसाठी लाचप्रकरण

वीज जोडण्या देण्यासाठी लाच मागण्याच्या प्रकरणी सध्या वादग्रस्त बनलेले वीज खात्याचे कनिष्ठ अभियंते विश्‍वनाथ भट यांना भ्रष्टाचार विरोधी पोलिसांनी (एसीबी) चौकशीसाठी समन्स पाठविले होते. परंतु काल ते एसीबीसमोर हजर राहिले नाही. संबंधित खात्याच्या अधिकार्‍यांना विचारले असता भट यांना समन्स न मिळाल्याने ते हजर न राहिल्याचे सांगण्यात आले.
एका ग्राहकाकडे वीज जोडणीसाठी लाच मागत असल्यासंबंधीचा व्हिडीओ गेले दोन दिवस ‘व्हायरल’ होत होता. त्यामुळे वीज खात्यात खळबळ निर्माण झाली होती. त्याची दखल घेऊन भ्रष्टाचार विरोधी पोलिसांनी भट यांच्याविरूद्ध एफआयआर दाखल केला व चौकशीस हजर राहण्यासाठी ‘समन्स’ पाठविले. भट पोलिसांसमोर कधी हजर राहतील याबाबत साशंकता व्यक्त करण्यात येत आहे. दरम्यान लाच घेताना रंगेहात अटक केलेले उत्तर गोव्याचे अतिरिक्त जिल्हाधिकारी साबाजी शेट्ये सद्या पोलीस कोठडीची हवा खात आहेत.