शेतकर्‍यांवरील गोळीबाराचा विहिंपकडून निषेध

0
78

>> गोळीबार पोलिसांकडून झाल्याची गृहमंत्र्यांची कबुली

मध्यप्रदेशमधील शेतकरी आंदोलनावेळी राज्य पोलिसांनी शेतकर्‍यांवरील केलेल्या गोळीबाराचा विश्‍व हिंदू परिषदेने तीव्र निषेध केला आहे. केंद्र सरकारने तातडीने उपाययोजना म्हणून शेतकर्‍यांची सर्व कर्जे माङ्ग करावी असे आवाहन विहिंपचे अध्यक्ष प्रवीण तोगडिया यांनी केले आहे. स्वामीनाथन आयोगाच्या शिङ्गारशींची तातडीने अंमलबजावणीची मागणीही त्यांनी केली. शेतकर्‍यांना कर्जबाजारी ठेवून आणि आत्महत्या करायला लावून देशात रामराज्य निर्माण करण्याचे स्वप्न पूर्ण होऊ शकणार नाही असे तोगडिया यांनी म्हटले आहे. मंदसौरमध्ये शेतकर्‍यांवर पोलिसांना गोळीबार करण्याची चिथावणी कोणत्या कारणाने मिळाली हे समजण्यापलीकडचे आहे. काश्मीरात विभाजनवाद्यांवरही आमचे सैनिक रबरी गोळ्या झाडतात. असे असताना आमच्याच शेतकर्‍यांवर गोळीबार करून त्यांना कसे काय ठार मारले जाते असा सवाल त्यांनी केला.
या पार्श्‍वभूमीवर शेतकर्‍यांचा प्रश्‍न राज्य सरकारांवर सोपवण्याऐवजी केंद्र सरकारने शेतकर्‍यांना अनुकूल उपाययोजना करावी. त्यांची सर्व कर्जे माङ्ग करावी व त्यांच्या उत्पादनांना आधारभूत किंमत द्यावी असे आवाहन तोगडिया यांनी केले.
गोळीबार पोलिसांकडून
झाल्याची गृहमंत्र्यांची कबुली
मंदसौरमधील शेतकरी आंदोलनावेळी पोलिसांच्या गोळीबारात पाचजण मरण पावले असल्याचे मध्यप्रदेशचे गृहमंत्री भूपेंद्र सिंग यांनी काल मान्य केले. या घटनेच्या दिवशी पाच जणांचा मृत्यू पोलिसांच्या गोळीबारात झाला नव्हता असे प्रशासनातर्ङ्गे सांगण्यात आले होते.