राज्यात विविध भागांमध्ये वीजपुरवठ्यात वारंवार व्यत्यय

0
63

गेल्या दोन दिवसांपासून पणजीसह राज्याच्या विविध भागांत विजेचा लपंडाव होत असून विजेच्या कमी-जास्त दाबामुळे पंखे, टीव्ही अशी विजेवर चालणारी अनेक उपकरणे निकामी झाल्याच्या तक्रारी आल्या आहेत.
संबंधीत अधिकार्‍यांना विचारले असता, थेट वाहिन्यांच्या बाबतीत कोणतीही समस्या नसून स्थानिक ट्रान्सफॉर्मर व अन्य यंत्रणेत बिघाड होत असल्यानेच वीजपुरवठा खंडित होत असावा असे सांगण्यात आले. काल संध्याकाळी पणजी व सभोवतालच्या भागातील वीजपुरवठा वारंवार खंडित होत होता. त्यामुळे लोकांना बरेच त्रास झाले.