राज्यसभेसाठी सर्वमान्य उमेदवार हवा ः सरदेसाई

0
70

>> भाजपकडे आवश्यक संख्याबळ नाही

राज्यसभेच्या निवडणुकीत भाजपाचा उमेदवार उभा केल्यास तो निवडून येणे कठीण आहे. तेवढे संख्याबळ भाजपाकडे नसल्याने भाजपा, गोवा ङ्गॉरवर्ड व म.गो. पक्ष तसेच अपक्ष आमदारांना विश्‍वासात घेऊन सर्वमान्य उमेदवार ठेवला पाहिजे असे वक्तव्य कृषीमंत्री विजय सरदेसाई यांनी काल येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत केले.
भाजपाजवळ १२ आमदारांचे संख्याबळ आहे. ४० सदस्यांच्या विधानसभेत बारा आमदारांच्या बळावर भाजपाचा उमेदवार निवडून येणार नाही. उमेदवार निवडून येण्यासाठी भाजपा, गोवा ङ्गॉरवर्ड, म.गो.लाही योग्य ठरेल अशा उमेदवाराला उमेदवारी दिली गेली पाहिजे. गोवा ङ्गॉरवर्डचे तीन आमदार आहेत. त्यांनी उमेदवार उभा केल्यास तो निवडून येणार नाही. हे सरकार आघाडी सरकार असल्याने सर्वांना मान्य होईल असा उमेदवार असावा, असे सरदेसाई यांनी सांगितले.
भाजपातर्ङ्गे माजी मंत्री व ज्येष्ठ भाजपा नेते राजेंद्र आर्लेकर, माजी आमदार दामू नाईक, माजी आमदार सिद्धार्थ कुंकळयेकर यापैकी एकाला देण्याचा विचार असल्याचे समजते. विजय सरदेसाई यांचे प्रतिस्पर्धी दामू नाईक असल्याने त्यांना उमेदवारी देण्यास सरदेसाईंचा विरोध आहे.
सांगे येथील वाणी बु्रअरीज कारखान्याला सरदेसाई यांनी तीव्र विरोध केला. तेथील ९०० माड कापण्यापेक्षा तो कारखाना अन्यत्र हलवावा अशी मागणी सरदेसाई यांनी यावेळी केली.