डिफेन्स एक्स्पो गोव्यात आयोजिण्याबाबत निर्णय नाही

0
99

गोव्यात २०१८ साली ‘डिफेन्स एक्स्पो’ भरवावा की नाही त्याबाबत संरक्षण मंत्रालयाने अद्याप निर्णय घेतला नसल्याचे केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री सुभाष भांब्रे यांनी काल पत्रकार परिषदेत सांगितले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या सरकारला तीन वर्षे पूर्ण केल्याच्या पार्श्‍वभूमीवर सरकारने केलेल्या कार्याची माहिती भांब्रे यांनी काल पत्रकार परिषदेत दिली.
केंद्रात मोदी सरकार सत्तेवर आल्यानंतर सरकारने देशातील उद्योगपतींना संरक्षणासंबंधीच्या शस्त्रांची निर्मिती करण्याचे काम हाती घेण्यास प्रोत्साहित केल्याचे ते म्हणाले.
मोदी सरकारच्या तीन वर्षांच्या काळात देशात अर्थ व्यवस्था बळकट झाली. संरक्षण क्षेत्रातही देश कधी नव्हे एवढा बळकट झाला. मेड इन इंडिया योजनेखाली देशात शस्त्र निर्मितीच्या कामाने वेग घेतल्याचे ते म्हणाले.
मोदी सरकार सत्तेवर आल्यानंतर देशात विदेशी गुंतवणूक वाढल्याचे भांब्रे म्हणाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मागील तीन वर्षांच्या काळात कित्येक देशांचे दौरे केले. तसेच त्या देशांना भारतात गुंतवणूक करण्याचे आमंत्रण दिल्याने देशात विदेशी गुंतवणूक कित्येक पटीने वाढल्याचे भांब्रे यांनी नमूद केले.