‘सी प्लेन’ने गाशा गुंडाळला

0
115

गेल्या पर्यटन मोसमात राज्यात ज्या कंपनीने ‘सी प्लेन’ सुरू केले होते त्या कंपनीचे दिवाळे निघाल्याने कंपनीने ‘सी प्लेन’ सेवा रद्द केल्याची माहिती पर्यटन विकास महामंडळाचे अध्यक्ष नीलेश काब्राल यांनी दिली. मात्र, आता आणखी एखादी कंपनी ही सेवा सुरू करण्यास इच्छुक आहे की का ते पाहिले जाईल असे काब्राल म्हणाले.
गोवा हे कुटुंबासाठीचे पर्यटन स्थळ (ङ्गॅमिली डेस्टिनेशन) अशी गोव्याची प्रतिमा निर्माण करण्यासाठी आम्ही प्रयत्नरत आहोत व येणार्‍या ५ वर्षांच्या काळात ते साध्य करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले असल्याचेही यावेळी काब्राल यांनी सांगितले.
गोव्यात जास्तीत जास्त लोक कुटुंबासह पर्यटनासाठी यावेत व गोव्याची पर्यटन क्षेत्रात चांगली प्रतिमा निर्माण व्हावी अशी आमची इच्छा आहे, असे काब्राल यांनी यावेळी स्पष्ट केले.
केंद्र सरकारने गोमांसासंबंधी (बीङ्ग) जो निर्णय घेतला आहे त्याचा गोव्याच्या पर्यटनावर परिणाम होईल, असे तुम्हाला वाटते काय, असे पत्रकारांनी विचारले असता गोवा सरकारने गोमांस बंदी केलेली नाही. त्यामुळे तो प्रश्‍नच उद्भवत नसल्याचे ते म्हणाले.