तटरक्षक दलाने बुडणार्‍या बार्जवरील २७ जणांना वाचविले

0
46

दक्षिण कर्नाटकच्या उल्लाल किनार्‍याजवळील समुद्रात बुडणार्‍या एका बार्जवरील सर्व २७ जणांना काल भारतीय तटरक्षक दलाने सुखरूप वाचविले. याबाबत शनिवारी माहिती मिळाल्यानंतर तटरक्षक दलाने त्या दिवशी चौघांची लाईफ बोटच्या सहाय्याने सुटका केली होती. त्यानंतर उर्वरीत २३ जणांना काल किनार्‍यावर आणले. यासाठी दलाने लाईफ बोटचा वापर केला. समुद्र खवळलेला असल्याने शनिवारी रात्री मदतकार्य थांबवले होते.