दिगंबरना बजावलेले अजामीनपत्र वॉरंट वकील आल्यानंतर मागे

0
92

>> लुईस बर्जर घोटाळा प्रकरण

लुईस बर्जर घोटाळा प्रकरणी उत्तर गोवा विशेष न्यायालयाचे न्यायाधीश इर्शाद आगा यांनी काल मडगावचे आमदार व गोव्याचे माजी मुख्यमंत्री दिगंबर कामत यांना ते न्यायालयात हजर न राहिल्याबद्दल अजामीनपात्र अटक वॉरंट जारी केले होते. मात्र, नंतर ते मागे घेण्यात आले. या खटल्याची पुढील सुनावणी न्यायालयाने ठरवलेली नाही.
काल या खटला प्रकरणी सुनावणी होती. या सुनावणीच्या वेळी दिगंबर कामत यांच्यावतीने त्यांचे वकील न्यायालयात हजर राहणार होते. मात्र, सुनावणीची वेळ झाली तेव्हा वकील न्यायालयात हजर नव्हते. त्यामुळे न्यायमूर्ती इर्शाद आगा यांनी दिगंबर कामत यांच्याविरुद्ध अजामीनपत्र अटक वॉरंट जारी केले. मात्र, काही वेळाने कामत यांचे वकील न्यायालयात पोचल्यानंतर त्यांनी आपणाला काही अपरिहार्य कारणामुळे कोर्टात पोचण्यास उशीर झाल्याचे सांगितल्यानंतर न्यायाधीशांनी कामत यांच्याविरुद्ध बजावलेले अजामीनपात्र अटक वॉरंट मागे घेतले. मात्र, तत्पूर्वीच कामत यांच्याविरुद्ध अजामीनपात्र अटक वॉरंट बजावण्यात आल्याचे वृत्त सर्वत्र पसरल्याने तो चर्चेचा विषय ठरला होता.