ब्रिटनमध्ये दहशतवादी हल्ल्यात २२ ठार

0
90

सोमवारी रात्री मँचेस्टरमधील एक संगीत रजनी कार्यक्रम संपल्यानंतर झालेल्या एका आत्मघाती बॉम्बस्फोटात २२ जण ठार झाले तर मोठ्या प्रमाणात लोक जखमी झाले.
आरियाना ग्रँड या गायिकेच्या कॉन्सर्टमध्ये मोठ्या प्रमाणात युवावर्ग सहभागी झाला होता. हा कार्यक्रम संपल्यानंतर एकटाच असलेल्या आत्मघाती हल्लेखोराने स्वत:ला उडवून लावले. त्यात लहान मुलांसह २२ जण मृत्यूमुखी पडले. आत्मघाती हल्लेखोर आपला माणूस असल्याचे ‘इसिस’ या दहशतवादी संघटनेने म्हटले आहे.
या हल्ल्याचा ब्रिटनच्या पंतप्रधान तेरेसा मे तसेच अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी तीव्र निषेध केला आहे.