मुंबई इंडियन्स तिसर्‍यांदा आयपीएल चॅम्पियन

0
112

>> शेवटच्या चेंडूवर पुणेवर अवघ्या एका धावेने विजय

शेवटच्या चेंडूपर्यंत रंगलेल्या थरारक अंतिम लढतीत रायझिंग पुणे सुपरजायंट्‌स संघाचा अवघ्या एका धावेने पराभव करीत तिसर्‍यांदा आयपीएलमध्ये चॅम्पियन बनण्याचा मान मुंबई इंडियन्सने पटकावला. याचबरोबर विजेत्या संघाने पुणे विरुद्धची पराभवांची मालिकाही खंडित करण्यात यश मिळवले. विजयासाठी १३० धावांचे लक्ष्य गाठण्यासाठी ङ्गलंदाजीस उतरलेल्या पुणे संघाचे प्रथमच आयपीएल विजेतेपदाचे स्वप्न यामुळे उद्ध्वस्त झाले.
त्याआधी नाणेङ्गेक जिंकून मुंबई इंडियन्स संघाने प्रथम ङ्गलंदाजी स्वीकारली. मात्र त्यांची सुरुवातच खराब झाली. एक वेळ तर त्यांची स्थिती ७ बाद ७९ अशी दयनीय झाली होती. मात्र क्रुणाल पांड्याच्या ङ्गटकेबाजीमुळे त्यांना सन्मानजनक माजल मारणे शक्य झाले. कुणालने ३८ चेंडूत ४७ धावा ठोकताना मिशेल जॉन्सनच्या साथीने आठव्या यष्टीसाठी ५० धावांची भागीदारी नोंदवली. अखेरीस ही भागिदारी महत्त्वपूर्ण ठरली.
सलामीवीर पार्थिव पटेल (४) व लेंडल सिमॉन्स (३) हे झटपट बाद झाल्यानंतर रोहित शर्माने एक बाजू लावून धरण्याचा प्रयत्न केला. मात्र २४ धावांवर रोहित बाद होऊन परतला. पोलार्ड (७), रायडू (१२) व हार्दिक पांड्या (१०) हेही स्वस्तात बाद झाले. त्यामुळे मुंबई इंडियन्सला २० षटकांत ८ बाद १२९ अशी मजल मारता आली.
मुंबई इंडियन्सला मर्यादित धावसंख्येत रोखण्यात महत्त्वपूर्ण वाटा उचलताना जयदेव उनाडकट, ऍडम झम्पा व डॅनि ख्रिस्तियन यांनी प्रत्येकी दोन बळी मिळवले. मात्र अखेरीस त्यांच्या या कामगिरीचे चीज होऊ शकले नाही.
मुंबईच्या आव्हानाचे लक्ष्य गाठण्यासाठी ङ्गलंदाजीस उतरलेल्या पुणे संघाचा सलामीवीर राहुल त्रिपाठी ३ धावा करून परतला. त्यानंतर अजिंक्य रहाणे व स्टिव्हन स्मिथ यांनी संयमी ङ्गलंदाजी करताना आपल्या संघाला १० षटकांत ५८ वर आणले. मात्र वैयक्तिक ४४ वर रहाणे मिशेल जॉन्सनचा बळी ठरला. त्यानंतर जॉन्सनने पुणेला वरचढ होऊ दिले नाही. जॉन्सनसह अन्य गोलंदाजांनी स्मिथ तसेच धोनीलाही रोखण्यात यश मिळवले. शेवटचे षटक थरारक ठरले. या षटकाच्या शेवट्या चेंडूवर विजयासाठी पुणेला चार धावांची गरज होती. मात्र जॉन्सनने दोन धावा देत विजयावर शिक्कामोर्तब केले. महत्त्वपूर्ण योगदान देताना जॉन्सनने सर्वाधिक ३ बळी मिळवले.