जनसुनावणीत कोळसा प्रकल्पास विरोध

0
85

>> प्रकल्प बंद करण्याची मागणी

दक्षिण गोवा जिल्हाधिकार्‍यांच्या आदेशानुसार तीन विस्तारीत प्रकल्पापैकी कोळसा आयातीची क्षमता वाढविण्यासंबंधी दक्षिण गोवा जिल्हाधिकारयांच्या आदेशानुसार गोवा राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाने वास्को येथील टिळक मैदानावर घेण्यात आलेल्या सार्वजनिक सुनावणीत गोव्यातील विविध भागातून उपस्थित राहिलेल्या नागरिकांनी या प्रकल्पास जोरदार विरोध दर्शवून हा कोळसा प्रकल्प कायमचा बंद करावा अशी मागणी केली. या सार्वजनिक सुनावणीत जिंदाल साऊथ वेस्ट पोर्ट कंपनीने आपल्या पर्यावरणीय तपासणी अहवालात अनेक प्रकल्पांची चुकीची माहिती दिल्याचे उघडकीस आल्याने त्यांच्या या प्रकल्पास केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाने मंजूरी न देण्याची मागणी यावेळी विरोधकांकडून करण्यात आली.
मुरगाव पोर्ट ट्रस्टने मुरगाव बंदरातील धक्का क्र. ५- अ आणि धक्का क्र. ६- या ठिकाणी तुर्तास जिंदाल जेएसडब्ल्यू कंपनी कोळसा आयात करत असून त्यांना ७ दशलक्ष टन कोळसा आयात करण्याची मंजूरी दिलेली आहे. पण आता ही क्षमता १५ दक्षलक्ष टनपर्यंत वाढविण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. तसेच अन्य दोन प्रकल्पाना एमपीटीने केंद्रीय पर्यावरण व वन खात्याची तसेच इतर संबंधित खात्याच्या परवानगी मिळविली होती. हा प्रकल्प सुरू झाल्यास समुद्रातील जैविक संपत्तीवर बराच परिणाम होणार असल्याने येथील मच्छीमार बांधवाकडून या प्रकल्पाकडून विरोध दर्शविण्यात आला होता. पण एमपीटीने मच्छीमारांच्या विरोधाची दखल न घेता आपल्या प्रकल्पांना चालना दिली. नंतर खारीवाडा येथील ऑल्ड क्रॉस फिशींग बोटमालक संघटनेने पुणे येथील राष्ट्रीय हरीत लवादाकडे याचिका सादर केली होती. हे प्रकल्प सुरू करण्यापूर्वी एमपीटीने सार्वजनिक सुनावणी घेतली नसल्याचा दावा त्यांनी आपल्या याचिकेत मांडला होता. यावर राष्ट्रीय हरीत लवादाने त्यांचा दावा मान्य करून एमपीटीच्या या तीनही प्रकल्पांना स्थगिती देऊन या प्रकल्पावर सार्वजनिक सुनावणी घेण्याचा आदेश दिला होता.
दरम्यान, या आदेशानुसार दक्षिण गोवा उपजिल्हाधिकार्‍यांनी गोवा राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाला या तीनही प्रकल्पावर सार्वजनिक सुनावणी घेण्याचा आदेश दिला होता. सर्व प्रथम २० मार्च रोजी वास्को येथील टुरिस्ट हॉस्टेलमधील सभागृहात घेण्याचा निर्णय घेण्यात आला होता. पण यावेळी विरोधकांनी हे सभागृह अपुरे पडणार असल्याचा दावा करून टिळक मैदानावर घेण्याची मागणी केली होती. विरोधकांनी केलेल्या मागणीची दखल घेऊन गोवा राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाने तीनही प्रकल्पावरील सार्वजनिक सुनावणी २६, २७ व २९ एप्रिल रोजी टिळक मैदानावर घेण्यो जाहीर केले. काल घेण्यात आलेल्या सार्वजनिक सुनावणीत कोळसा साठविण्याच्या क्षमतेवर जोरदार युक्तिवाद झाला. यावेळी व्यासपीठावर दक्षिण गोवा जिल्हाधिकारी स्वप्नील नाईक, संयुक्त जिल्हाधिकारी जॉन्सन फर्नांडिस व गोवा राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाचे पर्यावरणीय अभियंते संजीव जोगळेकर उपस्थित होते. सुरुवातीला जेसडबल्यू कंपनीने आपल्या विस्तारीत प्रकल्पाचे उपस्थितांसमोर सादरीकरण केले. पण त्यांनी आपल्या विस्तारीत प्रकल्पाचा सविस्तर अहवाल सादर न करता थोडक्यात अहवाल सादर केल्याने उपस्थितांनी नाराजी व्यक्त केली