एमपीटीने खाजगीकरण थांबवावे : कार्लुस

0
52

>> कोळसा प्रदूषणावर नियंत्रण आणण्याचा सल्ला

एमपीटीने खाजगीकरण करण्याचे जे षड्‌यंत्र रचलेले आहे ते त्वरित थांबवावे. खाजगीकरण केल्यास रोजगार निर्मिती बंद होऊन त्याचा परिणाम युवा वर्गावर होणार. तसेच एमपीटीने चालवलेला बंदरावरील धक्क्यांचा विस्तार न करता, होत असलेल्या कोळसा प्रदूषणावर नियंत्रण आणावे. कारण कोळसा प्रदूषणाने अनेक वर्षे स्थानिक लोकांना त्रस्त केले आहे. त्याचा त्यांच्या आरोग्यावर परिणाम झाला आहे. तेव्हा कोळसा प्रदूषण रोखणे काळाची गरज असल्याचे वास्कोचे आमदार कार्लुस आल्मेदा यांनी काल पत्रकार परिषदेत सांगितले.
मुरगाव बंदरातून ट्रकद्वारे कोळसा वाहतूक होत असल्याने याच्या स्थानिकांतर्फे अनेक तक्रारी माझ्या आमदारकीच्या कार्यकाळात तसेच मुरगाव पालिका मंडळाकडे आल्या. याविषयी पालिका मंडळाच्या बैठकीत ठराव मांडून ही ट्रकद्वारे होत असलेली कोळसा वाहतूक त्वरित थांबवण्याचा निर्णय या बैठकीद्वारे घेण्यात आला होता. कारण यापासून संपूर्ण वास्को शहर तसेच इतर परिसर प्रदूषित होऊन कोळसा प्रदूषणाच्या विळख्यात सापडला होता. आपण प्रत्येकवेळी विधानसभेत कोळसा प्रदूषणाविषयी आवाज उठविला आहे. आता मी प्रत्यक्षात जाहीर करतो की मुरगाव बंदरातून होणारी कोळसा वाहतूक, कार्गो थांबवावी व कोळसा प्रदूषण नियंत्रणात आणो जेणेकरून वास्कोवासिय तसेच इतर परिसरातील लोक शुध्द हवा घेऊ शकेल. तसेच एमपीटीने रात्री कोळसा वाहतूक आवाक्याबाहेर जाणार नाही याचीही दक्षता एमपीटीने घेणे गरजेचे
आहे.
मुख्यमंत्र्यांना साकडे घालणार
आपण याविषयी मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांच्याकडे बोलणी करून यावर उपाययोजना आणण्यासाठी शिष्टमंडळ निवडण्याचे मुख्यमंत्र्यांकडे निवेदन मांडणार असल्याचे कार्लुस यांनी स्पष्ट केले.