सर्व पालिकांना समान केडर द्यावा

0
66

>> पणजी मनपा बैठकीत ठराव

पणजी महापालिकेसह सर्व पालिका मंडळाना समान केडर देण्याच्या मागणीचा ठराव काल झालेल्या पणजी महापालिकेच्या बैठकीत संमत करण्यात आला. पणजी बाजारातील गाडे घोटाळा प्रकरणी चौकशी समितीने गाड्यांच्या प्रकरणी महापालिकेला अहवाल सादर केला आहे. त्यापैकी मूळ यादीतील ६० गाडे कायदेशीर असल्याचे दिसून आल्याचे महापौर सुरेंद्र फुर्तादो यांनी सांगितले.
पणजी बाजारात एकूण ११० गाडे असून पैकी ९१ गाड्यांच्या मालकांनी आवश्यक दाखले समितीला सादर केल्याची माहिती त्यांनी दिली. शहरातील पे पार्किंग विषयीचा प्रस्ताव पालिका आयुक्तांनी अभ्यासासाठी वकिलाकडे आहे. त्यामुळे अद्याप नवीन पे पार्किंग कंत्राट दिलेले नाही, असे महापौरांनी सांगितले.एमजी मार्गावरील जेे. के. ऍण्ड सन्स कंपनीने आपल्या आस्थापनासाठी आवश्यक तो वास्तव्याचा दाखला न घेतल्याने संबंधितांवर कारवाई करण्याचे आश्‍वासन महापौरांनी दिले. एका व्यापारी प्रदर्शनाची ‘फी’ पालिकेला दिलेली नाही. ती वसूल केली जाईल, असेही बैठकीत सांगण्यात आले.