मोटारसायकलवर तोललेली जिंदगी !!

0
115

– अंजली मुतालिक

मोटारसायकल आपल्या घरची सदस्य आहे. त्यामुळे केवळ दिवाळी-दसरा, उत्सव अशा वेळीच नाही तर, कायमच तिचे आपण कोडकौतुक करत असतो. आडवाटेला कुठे पंक्चर झाली तर, मित्राला फोन करून चाक खोलून नेतो. माणूस अचानक कधी साथ सोडतो तर बाईक हे यंत्र आहे. या गाडीमुळे हेल्मेट, रेनकोट, टोपी, स्कार्फ, गॉगल आमचे मित्र बनले आहेत…

गुरुत्व बलाचा सुवर्णमध्य साधत आमचे आयुष्य दोन चाकांवर स्थिरावलेय. तो पुढे बसला की पाठीमागून मी जायचेय. पुढे टाकीत लागणारे पेट्रोल कधी अर्थरूपी ऑईल त्यानेच टाकायचेय. पाठीमागे मी बसून संसारपिशव्या सांभाळतेय. तेल-मीठ-साखर सोबत वाहून गोडीन राहायचेय.
अशा चल आमच्या जीवनातील आमची प्रतीके-पिल्ले यांच्याकडे पाहत वळणावळणाचा आमचा नित्य प्रवास आनंदी करायचाय. आमच्या सामान्य माणसाची जिंदगी या मोटारसायकलने किती समृध्द केली आहे. बाईक पुढे पुढे जात आहे. रस्त्यात कोणी आप्त, मित्र भेटला तर क्षणभर र्रिीीश घेतला जातोय. पूर्वी संसारात किक मारून घाम निघायचा आता बटन दाबताच ऍक्सिलेटर पिळला जातोय…परिस्थितीवर आरूढ होऊन वेळेचा क्लच वेळेवर दाबला जातोय अन् समंजसपणे गिअर बदलतोय. नवनवीन ठिकाणे, शाळा दिसली की नियंत्रित चाल करतोय. पुढील चाक ते मागील चाक मी दोघेही संयमाने चालतो आहोत, सदैव सोबती आहोत. आमच्या मध्यमवर्गीयांची ही जोडी सर्वत्र दिसते. कधी झाडाखाली, मैदानावर, बंद दुकानाच्या दारात, कधी सम-विषम तारीख पाहून सुयोग्य ठिकाणी विसावतेय आमची गाडी. गाडीवरील पिलांच्या अस्तित्वामुळे कधी फुगे तर कधी भिरभिरी, माऊशार भालू किंवा बाहुलीमुळे या मोटारसायकलला सच्च्या जिवंतपणा येतो.
काळ्या माशांच्या पिशवीतून पौष्टिकता तर टोमॅटो-पालेभाज्या यांच्या असण्याने जीवनसत्त्व आणतो आहोत आमच्या जगण्यात! कधी सिलिंडर वाहतोय. दवाखान्यात लागणार्‍या ऑक्सिजनच्या पुरवठ्याइतकाच जरुरीचा असतो आम्हाला हा घरगुती सरी. मग कधी पुढे पायात तर कधी मागे लावून आम्ही आमचे पोट चालवतोय. कधीतरी एखाद्या गरजेच्या दारात धुळीत माखलेली बाईक पाहिली ना की या गाड्या अनाथालयात आपलेच जवळचे नातेवाईक असावेत असे वाटते. तरुणपणी काम करून घेतले आणि त्याच पिकल्या गाड्यारूपी पानांना आपण दूर करतोय असे भासते, पण नवीन आरटीओ नियमाप्रमाणे दिवसाही प्रकाशमान असणारी किक मारताच हेडलाईट ऑन होणारी प्रकाशमान भविष्य असलेली आपली तुमची आमची सर्वांची लाडकी बाईक वेगवेगळ्या नावाच्या पाट्या घेऊन रोडवर धावताना नक्कीच आवडेल. अपघात पण कमी होतील, अशी आशा करूयात!
आडवाट, पायवाट, खाचखळगे या सगळ्यातून आम्ही आमच्या बुजुर्गांना आवश्यक आरोग्य सुविधा मिळवून देतो. लग्नकार्य, मंदिरे, नातेवाईक भेटी, शिक्षण या आणि अशा सर्व कामाला मदत करणारी आमची मोटारसायकल आमच्या घरची सदस्य आहे. आम्ही केवळ दिवाळी-दसरा, उत्सव अशा वेळीच नाही तर, कायमच तिचे कोडकौतुक करत असतो. आडवाटेला कुठे पंक्चर झाली तर, मित्राला फोन करून चाक खोलून नेतो. माणूस अचानक कधी साथ सोडतो तर बाईक हे यंत्र आहे हे आम्ही पूर्ण जाणून आहोत.
या गाडीमुळे हेल्मेट, रेनकोट, टोपी, स्कार्फ, गॉगल आमचे मित्र बनले आहेत. आर. के. लक्ष्मण जेव्हा आपल्याच देशात तयार झालेली मोटारसायकल वापरतो तेव्हा तो असामान्य होतो कारण तो आपल्या कुटुंबाइतकाच प्रेम आपल्या देशावर करत असतो…