डॉ. नरेंद्र भट यांना विद्याधिराज पुरस्कार प्रदान

0
199

पर्तगाळी मठात काल आयोजित एका विशेष समारंभात उडुपी कर्नाटक येथील प्रसिद्ध स्त्री रोग तज्ज्ञ डॉ. टी. नरेंद्र भट यांना २०१६ चा विद्याधिराज पुरस्कार विद्याधिराज तीर्थ स्वामी महाराजांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. रोख रक्कम, वटवृक्षाची प्रतिकृती आणि मानपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.
या समारंभाच्या व्यासपीठावर शिष्य स्वामी श्रीमद् विद्याधिश तीर्थ श्रीपाद वडेर स्वामी, मठ समितीचे अध्यक्ष श्रीनिवास धेंपो, पुत्तू पै उपस्थित होते.
पोर्तुगीज राजवटीत सारस्वत
समाज देशोधडीला लागला. तरी त्यांनी आपली संस्कृती सांभाळली. अशा व्यक्तींच्या कार्याची दखल घेतली जाते. समाजात एकता असल्यास त्या समाजाला नावलौकिक प्राप्त होत असतो. अशा शब्दात स्वामीजींनी आपल्या आशीर्वचनात मत व्यक्त केले.
गुरुस्वामींनी अमृतवाणीने भक्तवृंद जोडले. आपल्या मनोधैर्याने शारीरिक व्याधींवर मात करून गुरुस्वामीनी केलेल्या कार्याची शिष्यस्वामी श्रीमद् विद्याधिश तीर्थानी प्रशंसा केली.
यावेळी तीर्थ हल्ली येथील नागेश उर्ङ्ग श्रीनिवास रामदास भट आणि मंगळूर येथील रामकृष्ण वामन भट यांना पुरुषोत्तम पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
कार्य सिद्धीस नेण्यास देवत्त्व आणि गुरुंचा आशीर्वाद गरजेचा असून शिक्षक व डॉक्टर सदोदित वंदनिय असतात. माणसाचे मन साङ्ग असायला हवे सांगून आपल्या सेवेची पावती मिळाल्याबद्दल डॉ. भट यांनी कृतज्ञता व्यक्त केली.
मठ समितीचे अध्यक्ष श्रीनिवास धेंपो यांनी स्वागतपर भाषणात मठ परंपरा आणि गुरुपरंपरेचा इतिहास कथन केला. कार्यक्रमाचे संचालन अनिल पै यांनी तर पुत्तू पै यांनी गौरव मूर्तींचा परिचय करून दिला.