आज राज्याचा अर्थसंकल्प

0
100

आज गोवा विधानसभेत मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर २०१७-१८ वर्षासाठीचा राज्याचा अर्थसंकल्प मांडणार असून घाईगडबडीत तयार केलेला अर्थसंकल्प कसा असेल यावर सर्वांचेच लक्ष लागले आहे. यंदाच्या अर्थसंकल्पात सर्वसामान्य जनतेवर बोजा पडेल अशा कोणत्याही तरतुदी नसतील, असे मुख्यमंत्री पर्रीकर यांनी यापूर्वीच स्पष्ट केले आहे. त्यामुळे अर्थसंकल्प आम आदमीला दिलासा देणार असेल अशी अपेक्षा आहे. राज्यपालांनी आपल्या अभिभाषणात सन २०१९ पर्यंत खुल्या जागेतील शौचापासून गोवा मुक्त करण्याचे आश्‍वासन दिले असल्याने अर्थसंकल्पात यासंबंधी विशेष तरतुदीची शक्यता आहे.
आरोग्य, शिक्षण आदी क्षेत्रांतील पायाभूत सुविधा मजबूत करण्यावर भर असेल. निवडणुकीत दिलेली आश्‍वासने जनतेला चिमटा न काढता ती पूर्ण करण्यावर अर्थसंकल्पात सरकारचा भर राहील.