म्हादई ः कर्नाटकाच्या साक्षीदाराची भंबेरी

0
93

म्हादई पाणी तंटा सुनावणीवेळी काल ऍड. आत्माराम नाडकर्णी यांनी कर्नाटकाच्या साक्षीदाराची उलटतपासणी घेताना प्रश्‍नांचा भडीमार करत कर्नाटकाला उघडे पाडले. साक्षीदाराने दिलेल्या प्रतिज्ञापत्रावर कोणतीही शहानिशा करण्यात आलेली नाही. तसेच त्या प्रतिज्ञापत्रावर साक्षीदाराने स्वाक्षरीही केली नसल्याचे नाडकर्णी यांनी लवादाच्या निदर्शनास आणून दिल्याने साक्षीदाराची भंबेरी उडाली. यावेळी नाडकर्णी यांनी कर्नाटकाच्या साक्षीदाराच्या वरील बेजबाबदार कृतीवर तीव्र हरकत घेतल्यानंतर लवादाने हा मुद्दा उचलून धरला. कर्नाटकाच्या वकिलांना साक्षीदाराने दिलेल्या प्रतिज्ञापत्राची शहानिशा करण्याचे आदेश देत पूर्ण अभ्यास करून प्रतिज्ञापत्रावर स्वाक्षरी करण्यास लवादाने सांगितले. कर्नाटकाच्या साक्षीदाराची उलटतपासणी आजही सुरूच राहणार आहे.