प्रमोद सावंत यांची सभापतीपदी निवड

0
79

भाजपचे उमेदवार आमदार डॉ. प्रमोद सावंत यांची काल सभापतीपदी २० विरुद्ध १५ मतांनी निवड झाली. कॉंग्रेसचे उमेदवार आलेक्स रेजिनाल्ड लॉरेन्स यांचा त्यांनी पराभव केला. प्रमोद सावंत यांच्या बाजूने भाजपचे ११, मगो व गोवा ङ्गॉरवर्डचे प्रत्येकी ३ व तीन अपक्ष आमदारांनी मतदान केले. तर रेजिनाल्ड लॉरेन्स यांच्या बाजूने १५ कॉंग्रेस आमदारांनी मतदान केले.

कॉंग्रेस उमेदवार आलेक्स रेजिनाल्ड लॉरेन्स हे सभागृहात उशिरा पोचल्याने स्वतःच्या बाजूने मतदान करू शकले नाहीत. रेजिनाल्ड यांच्याप्रमाणेच भाजपचे कुडचडेचे आमदार नीलेश काब्राल हेही सभागृहात उशिरा पोचल्याने तेही पक्षाच्या उमेदवाराच्या बाजूने मतदान करू शकले नाहीत. तर राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आमदार चर्चिल आलेमाव यांनी कुणालाही मत न देता तटस्थ राहणे पसंत केले.
सभापतीपदासाठीच्या उमेदवारी-साठीचे एकूण सात ठराव आले होते. पैकी प्रमोद सावंत यांचे नाव सुचवणारे चार ठराव तर आलेक्स रेजिनाल्ड लॉरेन्स यांचे नाव सुचवणारे तीन ठराव होते. प्रमोद सावंत यांचे नाव सुचवणारे व अनुमोदन देणारे यांच्यात प्रत्येकी राजेश पाटणेकर व ग्लेन टिकलो, सुदिन ढवळीकर व मनोहर आजगावकर, विजय सरदेसाई व रोहन खंवटे, गोविंद गावडे व प्रसाद गावकर यांचा समावेश होता. तर आलेक्स रेजिनाल्ड लॉरेन्स यांचे नाव सुचवणारे व अनुमोदन देणार्‍यांमध्ये प्रत्येकी लुईझिन ङ्गालेरो व बाबू कवळेकर, दिंगबर कामत व जेनिङ्गर मोन्सेर्रात आणि इजिदोर ङ्गर्नांडिस व रवी नाईक यांचा समावेश होता. कॉंग्रेसचे सभापतीपदासाठीचे उमेदवार आलेक्स रेजिनाल्ड लॉरेन्स हे स्वतः उशिरा पोचल्याने त्यांना मतदानात भाग घेता आला नाही. तर कॉंग्रेसचे एक आमदार विश्‍वजित राणे यांनी यापूर्वीच राजीनामा दिलेला असल्याने ते सभागृहात उपस्थित नव्हते. मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर हे गोवा विधानसभेचे सदस्य नसल्याने ते मतदानात भाग घेऊ शकले नाहीत.

पदाची शान राखू ः डॉ. सावंत
सभापतीपदी निवड झाल्यानंतर बोलताना डॉ. प्रमोद सावंत म्हणाले की, आपण सभापती या नात्याने काम करताना सभागृहाची शान व मान राखू. आपण कोठंबी-साखळी या ग्रामीण भागातून आलेलो आहे असे सांगतानाच सभागृहातील ८० टक्के सदस्य हे आपणापेक्षा अनुभवी व वयाने मोठे आहेत याची आपणाला जाणीव असल्याचे ते म्हणाले.

पदाची शान राखू ः डॉ. सावंत
सभागृहाचे कामकाज करताना नियमांचा आपण भंग होऊ देणार नसल्याचे अभिवचन त्यांनी यावेळी दिले. यावेळी बरेच नवे सदस्य विधानसभेवर निवडून आलेले असून त्यांना प्रशिक्षण देण्याची गरज आहे आणि त्यासाठी प्रशिक्षण वर्ग घेण्यात येणार असल्याचे ते म्हणाले. गोवा हे एक आदर्श राज्य आहे असे सांगून गोंयकारपण जपून ठेवण्याची गरज असल्याचे ते म्हणाले.