पर्वरीत माधान्ह आहारातून १६ विद्यार्थ्यांना विषबाधा

0
91

काल सकाळी आल्त बेती, पर्वरी येथील चोपडेकर मेमोरियल सरकारी प्राथमिक शाळेतील १६ विद्यार्थ्यांना माध्यान्ह आहार घेतल्यानंतर उलट्या सुरू झाल्याने तारांबळ उडाली. यानंतर त्वरित दाखल झालेल्या पर्वरी आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय पथकाने विद्यार्थ्यांची तपासणी केली असता ४ विद्यार्थ्यांची प्रकृती अधिक खालावल्याने त्यांना बांबोळी इस्पितळात दाखल करण्यात आले आहे.
वरील शाळेतील विद्यार्थ्यांना नेहमीप्रमाणे काल सकाळी मधल्या सुटीत पर्वरी येथील गायत्री स्वयं साहाय्य गटातर्फे पाव-भाजी पुरवण्यात आली होती. ती प्रथम खाल्लेल्या १६ विद्यार्थ्यांना उलटी व जुलाब होण्यास सुरुवात झाली. शाळेच्या शिक्षकांनी ही माहिती पर्वरी येथील आरोग्य केंद्राला कळवली. त्यानंतर डॉ. रोशन नाझारेथ यांनी त्वरित धाव घेत बाधा झालेल्या १६ विद्यार्थ्यांची तपासणी केली. त्यांपैकी अश्रफ पानवाले, सोफियान शेख, समीर नालबंद व अल्ताफ शेख यांची प्रकृती खालावल्याने त्यांना गोमेकॉत पाठविण्यात आले तर इतर बाराजणांना प्राथमिक उपचारानंतर घरी पाठविण्यात आले. या भागाचे आमदार तथा महसूलमंत्री रोहन खंवटे यांनी शाळेला भेट देऊन विचारपूस केली. चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याचा इशारा त्यांना दिला. दरम्यान, शिक्षण संचालक गजानन भट यांच्याशी संपर्क साधला असता माध्यान्ह आहार पुरविणार्‍या स्वयं साहाय्य गटावर अहवाल उपलब्ध होईपर्यंत माध्यान्ह आहार पुरविण्यास बंदी घातली असल्याचेे सांगितल