सभापदीपदासाठी आज निवडणूक

0
99

>> डॉ. प्रमोद सावंत व आलेक्स रेजिनाल्ड रिंगणात

विधानसभेत आज सभापतीपदाची निवडणूक होणार असून भाजप आघाडीतर्ङ्गे वरील पदासाठी साखळीचे आमदार डॉ. प्रमोद सावंत यांनी तर कॉंग्रेसचे उमेदवार म्हणून आलेक्स रेजिनाल्ड लॉरेन्स यांनी काल सकाळी उमेदवारी अर्ज भरले. सरकार स्थापन केल्यानंतर विधानसभेत विश्‍वासदर्शक ठराव भाजप आघाडीने जिंकला असल्याने डॉ. सावंत यांची सभापतीपदी निवड नक्की मानली जात आहे.

जनतेने कॉंग्रेस पक्षाच्या बाजूने कौल दिला होता. परंतु भाजपने अनैतिकपणे आपल्या नेतृत्वाखाली सरकार स्थापन केले. जनतेने दिलेल्या कौलाचा आदर राखून आज होणार्‍या सभापतीपदाच्या निवडणुकीत आपल्या पक्षाचाच उमेदवार निवडून येईल, असा विश्‍वास कॉंग्रेस विधीमंडळ नेते बाबू कवळेकर यांनी काल पत्रकार परिषदेत व्यक्त केला. कॉंग्रेस पक्षाचे सोळाही आमदार संघटीत असल्याचा दावा त्यांनी केला.
जे लोक पक्ष सोडून गेले आहेत ते कॉंग्रेसमधून दोन ते तीन आमदार ङ्गुटतील, अशा अङ्गवा पसरविण्याचे काम करीत असल्याचे त्यांनी सांगितले. राष्ट्रवादीचे आमदार चर्चिल आलेमाव यांचा पाठिंबा मिळावा म्हणून आलेमाव यांच्याकडे संपर्क साधणार असल्याचे कवळेकर यांनी सांगितले. आमदार लॉरेन्स यांच्या
उमेदवारीचा अर्ज भरण्यासाठी सोळाही आमदार विधानसभेत गेले होते, अशी माहिती कवळेकर यांनी दिली. तत्पूर्वी, प्रदेश कॉंग्रेस विधीमंडळ गटाच्या बैठकीत सभापतीपदाच्या निवडणुकीचा उमेदवार म्हणून आमदार लॉरेन्स यांची एकमताने निवड केल्याचे त्यांनी सांगितले.