आपल्या हिरड्यातून रक्त येते का?

0
1637

– डॉ. श्रुती दुकळे, पर्वरी 

हिरड्यांना सूज येऊन रक्तस्त्राव सहज होत राहातो. हिरड्या दुखू लागतात. दातांभोवती असलेल्या हिरड्यांची पातळी खालावते. दातांभोवतीचे हाड निकामी होऊ लागते. दात हलू लागतात व अखेरीस ते वेळेआधीच गळून पडतात. ‘सीवीयर पेरिओडॉण्टाईटीस’मध्ये संपूर्ण हिरड्या व दातांभोवती असलेले हाड नष्ट होऊन उपाय करण्यापलीकडे नुकसान भोगावे लागते.

भारतात हिरड्यांचे रोग खूप दिसून येतात. १५ वर्षे आणि वरील वयोगटात ४५% लोक हिरड्यांच्या रोगांनी त्रस्त झालेले असतात. हिरड्यातून रक्त येण्यापासून रोगाची सुरुवात होऊन त्याचे रूपांतर अधिक विध्वंसक प्रकारात होते. हिरड्यांच्या या भयानक रोगांमुळे दात गळून पडतात.
हिरड्यांचा रोग म्हणजे नेमके काय?
हिरड्यांची व्यवस्थित काळजी घेण्यास आपण चुकला, तर हिरड्यांना संसर्ग होऊन हिरड्यांचा रोग निर्माण होतो. हिरड्या दातांभोवती असून दातांना आधार देतात. या हिरड्या फाईबसच्या (ऋळलीशी) साहाय्याने दातांना चिकटून असतात. हिरड्यांना संसर्ग झाल्यास त्यातील जिवाणू हे फाईबर्स नष्ट करतात व दातांना मिळणारा आधार नाहीसा होतो. हिरड्यांचा संसर्ग झाल्यास दातांभोवती असलेले ‘हाड’ ज्यामुळे दात तोंडात खंबीरपणे ठाम उभे असतात, निकामी होऊ लागते. दात तोंडात हलू लागतात व हळूहळू ते गळून पडतात. निरोगी हिरड्या व दातांमध्ये एक छोटीशी जागा असते. ज्याला आपण ‘सल्कस’ (र्डीश्रर्लीी) म्हणतो. हिरड्यांच्या रोगांमध्ये या ‘सल्कस’ची पातळी खोल होत जाते. खोल झालेल्या ‘सल्कस’ला ‘पेरिओडॉण्टल पॉकेट’ (झशीळेवेपींरश्र झेलज्ञशीं) असे म्हणतात. हे ‘पेरिओडॉण्टल पॉकेट’ हिरड्यांचा रोगाच्या गांभीर्याची जाणीव करून देते. अधिक खोल ‘पेरिओडॉण्टल पॉकेट’ म्हणजे अधिक गंभीर रोग.
हिरड्यांचे रोग दोन प्रकारचे असतात –
१. जींजीवाईटीस (ॠळपसर्ळींळींळी)
– हिरड्यांच्या रोगाची सुरुवात जींजीवाईटीसने होते. हिरड्यांना सूज येणे, वारंवार हिरड्यांतून रक्त येणे असे प्रकार यात घडतात. जींजीवाईटीस आपण थांबवू शकतो. योग्यरित्या ब्रश व फ्लोसिंग करून हिरड्या परत निरोगी बनू शकतात. जींजीवाईटीस होण्याचे मुख्य कारण म्हणजे दातांवर साठणारा जेवणाचा थर. हा थर संपूर्णपणे साफ करून हिरड्यांचा रोग घालवता येतो.
२. पेरिओडॉण्टाईटीस (झशीळेवेपींळींळी)
पेरिओडॉण्टाईटीस, माईल्ड (चळश्रव), मोडरेट (चेवशीरींश) व सीवीयर (डर्शींशीश) असे असते. जींजीवाईटीस झाल्यास त्याच्याकडे दुर्लक्ष झाले तर रोगाची पुढे प्रगती होऊन पेरिओडॉण्टाईटीस होते. हिरड्या खूप कमजोर बनतात. हिरड्यांना सूज येऊन रक्तस्त्राव सहज होत राहातो. हिरड्या दुखू लागतात. दातांभोवती असलेल्या हिरड्यांची पातळी खालावते. दातांभोवतीचे हाड निकामी होऊ लागते. दात हलू लागतात व अखेरीस ते वेळेआधीच गळून पडतात. ‘सीवीयर पेरिओडॉण्टाईटीस’मध्ये संपूर्ण हिरड्या व दातांभोवती असलेले हाड नष्ट होऊन उपाय करण्यापलीकडे नुकसान भोगावे लागते. सगळे दात गळून पडण्याच्या स्थितीत येतात.
कोणाला हिरड्यांचे रोग होण्याची अधिक शक्यता असते?
तंबाखू, पान खाणे, धुम्रपान करणे.
इतर शारीरिक रोगांनी त्रस्त असल्यास जसे मधुमेह.
काही औषधे घेत असल्यास उदाहरणार्थ स्टेरोईड्‌स, ऍण्टीएपीलेप्टीक, ड्राग्स कर्करोगाची औषधे, ‘केल्शियम पॅनल ब्लोकर्स’, गर्भ निरोधक गोळ्या.
दातांची रचना ओबड-धोबड असून त्यांची काळजी घेणे कठीण असल्यास.
गर्भवती स्त्रियांना.
अनुवांशिक कारणे (ॠशीशींळल ऋरलींेीी).
जुवेनाईल पेरिओडॉण्टाईटीसः-
कधी कधी आनुवंशिक कारणांमुळे तरुण वयात हिरड्यांचा रोग होऊ शकतो. त्याचा वेळीच उपाय न केल्यास हिरड्यांच्या रोगामुळे तोंडातील सर्व दात तरुण वयातच गमवावे लागतात.
हिरड्यांचा रोग झाल्यास कसे ओळखावे?
हिरड्यांमधून सहज रक्तस्त्राव होत राहतो.
हिरड्यांना सूज येऊन, हिरड्या लाल दिसू लागतात. हाताने स्पर्श केल्यास त्या दुखतात.
हिरड्यांची पातळी विलक्षणरित्या खालावते.
दात एकमेकांपासून अचानक दुरावू लागतात, दातांमधील अंतर वाढू लागते.
श्वास दुर्गंधी वाढते.
दात हलू लागतात व अखेरीस गळून पडतात.
खाताना, चावताना दातांमध्ये खूप फरक जाणवतो.
दातांची कवळी घालत असला तर ती अचानक घालण्यास त्रास संभवतो किंवा ती बरोबर बसत नाही.
हिरड्यांचा रोग का होतो व कसा होतो?
आपण काही खाल्ल्यावर किंवा जेवल्यानंतर दातांवर जेवणाचा एक थर साचतो. हा थर आपण नियमित ब्रश करून साफ करण्यास असमर्थ ठरलो तर तो अधिक साठून त्याचा खडा तयार होतो. हा खडा दातांवर घट्ट चिकटून राहतो. खडा ब्रशने साफ करता येत नाही. त्यासाठी आपण आपल्या डेंटिस्ट जवळ जाऊन तो साफ करून घ्यावा लागतो. (ऊशपींरश्र उश्रशरीळपस) या प्रकाराला दुर्लक्ष केल्यास खड्यामध्ये असणारे जिवाणू हिरड्यांचा संसर्ग घडवून आणतात. हिरड्यांचे फाईबर्स नष्ट करून टाकतात. हिरड्या कमजोर होऊ लागतात. हिरड्यांची जागा खड्याने भरते व हिरड्यांची पातळी खालावते. तदनंतर जिवाणू दातांभोवतीचे हाडही नष्ट करतात. ज्यामुळे दातांना मिळणारा आधार नाहीसा होतो, दात कमजोर बनून गळून पडतात.
हिरड्यांचा रोग कसा टाळता येतो?
ब्रश करणे व योग्यरीत्या फॉल्स वापरल्याने दात व हिरड्या निरोगी ठेवता येतात.
फ्लोराईड रहित टूथ पेस्ट व माऊथवॉश वापरल्यास ६ महिन्यातून एकदा डेंटिस्टजवळ जाऊन क्लिनिंग करून घेणे गरजेचे आहे.
हिरड्यांच्या रोगाची नुकतीच सुरुवात होत असल्यास अधिक सावधान राहून संपूर्णपणे काळजी घेऊन आपण त्याची प्रगती टाळून हिरड्या परत निरोगी बनवू शकतो.
हिरड्यांच्या छोट्याशा समस्या आढळल्यास लगेच आपल्या डेंटिस्टकडे चेकअपसाठी जाणे योग्य ठरेल.
हिरड्यांच्या रोगाचा उपचार काय?
सुरुवातीच्या स्तरावर आपल्या पद्धतीने दातांची व हिरड्यांची काळजी घेऊन नंतर डेंटिस्टकडे जाऊन क्लिनिंग केल्यास रोग टाळता येतो.
पण पेरिओडॉण्टाईटीस सीवीयर स्टेजवर पोहोचला तर त्याला अधिक काही उपचार करता येत नाहीत. नुकसान होऊन खराब झालेल्या दातांना काढून टाकावे लागते. रोगाची प्रगती थांबवण्यास हिरड्यांवर शस्त्रक्रिया करावी लागते. शस्त्रक्रिया झाल्यावर प्रामाणिकपणे तोंडाची काळजी घ्यावी लागते. संसर्ग असलेल्या हिरड्यांची साफसफाई करून त्यांना निरोगी बनवण्यासाठी प्रतिजैविकांचा उपयोग केला जातो.