विश्‍वासदर्शक ठराव पर्रीकरांनी २२ वि. १६ ने जिंकला

0
108

>> मतदानावेळी अनुपस्थित राहिलेल्या विश्‍वजित राणेंच्या राजीनाम्याने खळबळ

मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांच्या नेतृत्वाखालील आघाडी सरकारवरील विश्‍वासदर्शक ठरावासाठी काल खास बोलाविण्यात आलेले विधानसभेचे अधिवेशन नाट्यपूर्ण आणि खळबळजनक ठरले. पर्रीकर विधानसभेच्या पटलावर बहुमत सिद्ध करतील हे राजकीय निरीक्षकांना अपेक्षित होते. विश्‍वासदर्शक ठरावाविरोधात कॉंग्रेसचे सर्व १७ ही उमेदवार उभे राहण्याची अपेक्षाही होती. मात्र धक्कादायकरित्या त्यांचे विश्‍वजित राणे मतदानावेळी गायब झाल्याने पर्रीकर यांनी २२ विरुद्ध १६ अशी बाजी मारली.
त्यानंतर तातडीने विश्‍वजित यांनी कॉंग्रेसच्या प्राथमिक सदस्यत्वासह आमदारकीचाही राजीनामा दिला व तो सभापतींनी स्वीकारला. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे चर्चिल आलेमाव यांनीही ठरावाच्या बाजूने मतदान केले.
कोणावरही दबाव
आणला नाही ः पर्रीकर
आपल्या पक्षाला आता २३ जणांचा पाठिंबा असून आपल्या सरकारला पाठिंबा देण्यासाठी आपण कोणावरही दबाव आणला नाही. प्रत्येक घटकाने राज्याच्या हिताचा विचार करूनच पाठिंबा दिल्याचे पर्रीकर यांनी अधिवेशनानंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत सांगितले. येत्या दि. २२ रोजी सभापती व उपसभापतींची निवड होईल. २३ रोजी राज्यपालांचे अभिभाषण तर दि. २४ रोजी राज्याचा अर्थसंकल्प मांडणार असल्याचे त्यांनी सांगितले.
आज मंत्रिमंडळ बैठक
राज्यपालांच्या अभिभाषणास मान्यता मिळविण्यासाठी आज मंत्रिमंडळाची बैठक घेणार असल्याचे सांगून उद्या संध्याकाळपर्यंत सर्व मंत्र्यांना प्रत्येकी एक या प्रमाणे खातेवाटप करणार असल्याचे त्यांनी सांगितले. उर्वरीत दोन मंत्र्यांचा शपथविधी दि. १ एप्रिल नंतर होणार, असे ते म्हणाले.
किमान समान कार्यक्रम
१४ एप्रिलपर्यंत निश्‍चित
येत्या दि. १४ एप्रिलपर्यंत किमान समान कार्यक्रम निश्‍चित करणार असल्याचे त्यांनी एका प्रश्‍नावर सांगितले.
गोंयकारपण जतन करणे रोजगार निर्मिती व राज्याचे वेगळेपण कायम ठेवणे ही हे सरकारचे ध्येय असून त्यादृष्टीकोनातूनच निर्णय घेणार असल्याचे त्यांनी सांगितले. विश्‍वासदर्शक ठरावाच्यावेळी विश्‍वजित राणे गैरहजर राहण्यामागचे कारण विचारले असता, दुसर्‍या पक्षांच्या व्यवहाराच्या बाबतीत आपण भाष्य करू शकत नाही. त्यांच्या अंतर्गत प्रश्‍नात शिरण्याची आपली तयारी नसल्याचे ते म्हणाले. सर्व निवडणुका एकाचवेळी घेण्याच्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कल्पनेवर विचारले असता, घटनादुरुस्ती केल्यास गोव्यालाही ते लागू होईल, असे सांगून त्यांनी २०१९ साली राज्याच्या विधानसभेचीही निवडणूक होऊ शकेल याचे संकेत दिले.
१५ आमदारांची कोकणीतून शपथ
अधिवेशनाच्या सुरुवातीलाच हंगामी सभापती सिद्धार्थ कुंकळकर यांनी आमदारांना गुप्ततेची शपथ दिली. यावेळी विनोद पालयेकर, जयेश साळगावकर, रोहन खंवटे, ग्लेन टिकलो, आंतोन ङ्गर्नांडिस, ङ्ग्रान्सिस सिल्वेरा, गोविंद गावडे, एलिना साल्ढाणा, विल्ङ्ग्रेड डिसा, आलेक्स रेजिनाल्ड लॉरेन्स, विजय सरदेसाई, दिगंबर कामत, चर्चिल आलेमाव, लुईझिन ङ्गालेरो, क्लाङ्गासियो डायस व इजिदोर ङ्गर्नांडिस या पंधरा सदस्यांनी कोकणीत, दयानंद सोपटे, बाबू आजगावकर, राजेश पाटणेकर, प्रवीण झांटये, डॉ. प्रमोद सावंत, सुदिन ढवळीकर, मिलिंद नाईक, दीपक पावसकर व प्रसाद गावकर या नऊ सदस्यांनी मराठीत, ङ्ग्रान्सिस डिसोजा, जेनिङ्गर मोन्सेर्रात, पांडुरंग मडकईकर, विश्‍वजित राणे, प्रतापसिंह राणे, कार्लुस आल्मेदा, माविन गुदिन्हो, ङ्गिलीप नेरी रॉड्रिगीस व नीलेश काब्राल या ११ सदस्यांनी इंग्रजीत तर रवी नाईक, सुभाष शिरोडकर, बाबू कवळेकर यांनी हिंदीत शपथ घेतली.

राष्ट्रवादीकडून चर्चिलना
कारणे दाखवा नोटीस
राष्ट्रवादीचे आमदार चर्चिल आलेमांव यांनी काल विधानसभेत मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर सरकारच्या विश्‍वासदर्शक ठरावास पाठिंबा दिल्याने प्रदेश राष्ट्रवादीचे अध्यक्ष जुझे ङ्गिलीप डिसोझा यांनी त्यांना कारणे दाखवा नोटीस पाठवून सात दिवसांच्या आत स्पष्टीकरण देण्याचा आदेश दिला आहे.