सायाटिकाचे दुखणं…

0
273

– डॉ. मनाली महेश पवार (गणेशपुरी म्हापसा)

‘डॉक्टर’ माझं बसूनच ऑफिसमध्ये काम असतं. तरीही माझा एक पाय दुखतो. पाय दुखतो म्हणण्यापेक्षा पायातून चमक निघते, स्फिक् प्रदेशांपासून वेदना सुरू होऊन त्या क्रमो कटी, उरू, जानु, जंघा आणि पाय यांच्या मागील बाजूने अंगुलीपर्यंत संचारित होतात, अशी तक्रार घेऊन येणारे बरेच रुग्ण असतात. त्यांच्या मतानुसार आपली जड कामे नसतात, धावपळ नसते. छान बसूनच आरामात काम असतं, मग पाय दुखायचे कारणच काय? तर सतत बसून काम केल्याने आपल्या शरीरातील वात दोष दूषित होतो व स्फिक् प्रदेशी स्थान्‌संश्रय करतो व एकप्रकारचा वातव्याधी उत्पन्न करतो. आयुर्वेद शास्त्रामध्ये या व्याधीला ‘गृध्रसी’ असे म्हटले आहे. आणि आधुनिक शास्त्रानुसार यालाच सायाटिका (ीलळरींळलर) असे म्हटले जाते. डॉक्टर काही तपासण्या करून सायाटिकाचे निदान करतात व आपण सगळेच या निदानाशी परिचित आहोत. तर सायाटिका किंवा गृध्रसी म्हणजे नेमके काय?
आयुर्वेद शास्त्राप्रमाणे (गृध्रवत् चलते यस्मिन्‌|) गिधाजप्रमाणे असणारी ही चाल ज्या व्याधित असेत तो गृध्रसी रोग होय. या रोगामध्ये स्वकारणानी प्रकुपित झालेल्या वायुमुळे स्फिक्‌प्रदेश असणार्‍या वातवाहिन्यांचा प्रक्षोभ उत्पन्न होतो व त्यामुळे स्फिक् प्रदेशापासून वेदना सुरू होऊन क्रमाने पायाच्या मागील बाजूने अंगुलीपर्यंत संचारित होतात. वंक्षण संधिच्या विकृतीमुळे व रुग्णाला तो पाय नीट टेकवता येत नाही. रुग्ण चांगल्या बाजूच्या पायावर जोर करून चालतो व म्हणूनच गिधाडाप्रमाणे चाल येत असते.
आधुनिक शास्त्रानुसार ीलळरींळलर या नाडीवर दाब पडल्याने परिणामस्वरूप गृध्रसी (ीलळरींळलर) ची उत्पत्ती होते. या रोगात मांडिच्या बाजूस तोदयुक्त वेदना हे लक्षण उत्पन्न होते. रोगी चालताना लंगडतो. ीलळरींळल पर्शीींश च्या सर्व क्षेत्रांत स्पर्सासहत्व हे लक्षण मिळते. जानुसंधिचा पृष्ठभाग व जंघापृष्ठभाग या ठिकाणी स्पर्शासहत्व अतितीव्र स्वरुपाचे असते.
गृध्रसीमधील कारणे
रुक्ष, शीत, अल्प, लघु, तिक्त, कटू, कपाय असा अन्नाचे सेवन करणे, बेकरीचे पदार्थ, शीतपेय, आईस्क्रिम, चटपटित मसालेदार, पिझ्झा, बर्गर सारखे पदार्थ, पथ्य म्हणून स्वतःच ठरवून कडू, तुरट पदार्थांचा अतिरेक करणे, पथ्य म्हणून परत सारखा हलका, लघु आहार सेवन करणे, अल्प मात्रेत अगदी कमी खाणे, उपवास.
– अतिजागरण, अति चिंता
– सारखे बसून काम करणे किंवा अतिश्रम करणे
– विविध प्रकारचा अतिव्यायाम (उड्या मारणे, पोहणे, फार चालणे)
– वेगविधारण – मलमूत्रा दि वेगांचे धारण करणे
– आमात्पत्ति किंवा व्यवस्थित पचन न झाल्याने ‘आम’ तयार होणे.
– आघात (विशेषतः मर्माघात)
– उंचावरून किंवा वेगवान वाहनातून पडणे इत्यादी.
– वर्षाऋतूत, अन्न जीर्ण झाल्यानंतर, पहाटे तसेच सायंकाळच्या प्रथम प्रहरी स्वभावतःच वातप्रकोप आढळतो व या काळात वेदनाही तीव्र स्वरुपाची जाणवतात.
गृध्रसीची लक्षणे ः-
गृध्रसी हा वातव्याधी आहे. गृध्रसीचे दोन प्रकार असतात. केवळ वानडा व वातकफजन्य. जेव्हा आमोत्पत्ति होऊन दूषित कफाने वात अवरुद्ध होऊन वेदना उत्पन्न होतात, तेव्हा वातकफजन्य गृध्रसी उत्पन्न होते.
– स्फिक् प्रदेशापासून वेदना सुरू घेऊन पायाचा मागील बाजूने अंगुलीपर्यंत वेदनांचा संचार होणे हे या व्याधीचे प्रमुख लक्षण होय.
याचबरोबर पायामध्ये स्तंभ, सुई टोचल्याप्रमाणे वेदना आणि स्पंदन ही ही लक्षणे आढळतात.
या व्याधीमध्ये कालांतराने वंक्षण संधीचे ठिकाणी शूल, सशूलक्रिया, क्रियाल्पता वा क्रियाहानी यांसारखी लक्षणे उत्पन्न होतात.
वातडा गृध्रसीत तोद, शरीरावयांचे ठिकाणी व्रकृता येणे, जानु-उरू-कटी संधींच्या ठिकाणी स्तंभ आणि स्फुरण ही लक्षणे अधिक प्रमाणात आढळतात.
– वातकफजन्य, गृध्रसित अग्निमांद्याची लक्षणे मुखत्वे करून दिसतात. तंद्रा, मुखप्रसेक, गौरव, अरोचन, भक्तद्वेष, लालास्राव अधिक असणे ही अग्निमांद्य जनित लक्षणे वातकफजन्य गृध्रसीन आढळतात.
चिकित्सा व उपचार –
गृध्रसी हा वातज व्याधी असल्याने या व्याधीमध्ये मुख्यतः वातशामक चिकित्सा करावी.
* स्नेहन – यामध्ये विषगर्भ तेलाने संवाहन करावे. ते अनुलोमगतीने करणे आवश्यक आहे.
* स्वेदन – स्वेदनासाठी नाडीस्वेद वा अवगाह स्वेद वापरावा. वातहन द्रव्यांचा (निर्गुंडी, दशमूल, एरंडमूल इत्यादी) क्वाय स्वेदनासाठी वापरावा.
* मृदु संशोधन – रोज मृदुविरेचन द्यावे. आमलकी, आरग्वध किंवा त्रिफलाचूर्ण विरेचन द्यावे.
* बस्ति – अनुवासन वस्तिचा वापर किंवा रक्तमोक्षण जानुसंधींच्या वर किंवा खाली चार अंगुली रक्तमोक्षण करारे.
अग्निकर्म – स्फिक् प्रदेशी ज्या ठिकाणी सर्वाधिक स्पर्धासहत्व असेल त्या जागी अल्यानक तैल प्रतिसारण करून दहनकर्म केल्याने वेदना त्वरेने कमी होतात.
– गृध्रसीत वापरणारी औषधीद्रव्ये
– निर्गुण्डी, बन्या, पुनर्नवा, दशमूल, एरण्डमूल, रास्ता, माप, शीघ्रु, इत्यादी वातघ्न द्रव्ये.
गृध्रसीत वेदनाप्रशमनासाठी वापरणारे कल्प ः-
त्रिफळा गुग्गुल, वातविध्वंस, समीरपन्नग, अल्ल्यातकासव, अल्ल्यानक पर्पटी, गोक्षुरादि गुग्गुल, कैशोर गुग्गुल, सहचरारि कपाय, रास्ताएरण्डीदि कपाय. रास्नासप्तक कपाय इत्यादी.
काही घरगुती उपाय वेदनाशमनासाठी ः-
* रोज मोहरीच्या व लवंग, लसूणच्या तेलाने घरीच वरून खाली या पद्धतीने मालिश करावे. लवंग व लसूण करपेपर्यंत जाळावी व त्या तेलाने मालिश करावे.
* सूर्यनमस्कार रोज घालावे. जेणेकरून आपला मणका सरळ राहिल.
* पूर्ण मणका सरळ राहील याच पद्धतीत बसणे. वाकून बसणे टाळावे.
* रोज सकारात्मक दृष्टीकोन ठेवून योग करावा.
* योग्य शांत झोप घ्यावी. झोपताना सरळ झोपावे. बाक काढून झोपू नये.
गृध्रसीमधील पथ्यापथा
* उडीद, कुलीथ, गहू, जुने तांदूळ यांचा धान्यांचा अधिक वापर करावा. अम्लफळे, डाळिंब, द्राक्षे, आवळा यांचे राजे सेवन. भाज्यांमध्ये पडवळं, शेवग्याच्या शेंगा यांचा वापर करावा.
* दूध व तुपाचा भरपूर उपयोग करावा.
* मांसरसाचा उपयोग करावा.
* रोज मृदुविरेचन म्हणून एरंडस्नेहाचाही वापर करता येतो. एक चमचा एरण्डतेल एक ग्लास गरम पाण्याबरोबर रात्री झोपताना घ्यावे किंवा कणिक मळताना एक चमचा एरण्डतेल घालून, त्या पिठाची चपाती खावी.
रोज अभ्यंगासाठी तीळ तेलाचा वापर करून नंतर उष्णोदलाने स्नान करावे.
अपथ्यकर आहार-विहार ः-
* वाटाणा, चणा, राजमा सारखे वात वाढविणारे धान्याचे सेवन करू नये.
* दिवसा झोपू नये, रात्री जागरण करू नये.
* कुठलेही वेग धारण करू नये.
* हा त्रास असलेल्यांनी जास्त प्रवास करू नये.
गृध्रसी या व्याधीमध्ये प्रचंड वेदना असतात म्हणून फक्त वेदनाशामक औषधे घेत बसू नये. योग्य तो डॉक्टरांचा सल्ला घेऊन योग्य पूर्ण चिकित्सा घ्यावी तसेच कारणांचा विचार करता हा एक व्यवसायजनीत व्याधी आहे. शिंपी, वाहनचालक, शिक्षक, घरकाम करणारे, स्वयंपाकी, गार्ड किंवा वजन उचलणार्‍या व्यक्तींमध्ये या व्याधीचा प्रादुर्भाव जास्त आढळतो. त्यामुळे या व्याधीचे शिकार होण्यापूर्वीच योग्य त्या आहार-विहाराने, व्यायाम व योगासने करून स्वतःला गृध्ररीपासून वाचवावे.