वैमानिकाची कसोटी

0
128

– अनंत जोशी

इथे वैमानिकाची खरी कसोटी असते. लाटांमुळे वर-खाली होणारे जहाज, जहाजाचा वेग तसेच स्वतः हेलिकॉप्टरचा वेग या सगळ्यांचा ताळमेळ ठेवावा लागतो. एखादी चूक जीव व मालमत्ता गमाविण्यास भाग पाडू शकते.

युद्धनौका जेव्हा एकटी जलसङ्गरीवर असते तेव्हा सराव, आपत्कालीन तयारी ही कधी व कशी करून घ्यायची हे सर्वेसर्वा कप्तानाच्या हाती असते. त्याच्या आधिपत्याखाली असलेल्या अधिकार्‍यांचाही यात मोठा सहभाग असतो. त्यांचे आपल्या व्यवसायावर प्रभुत्व असेल तर सर्वकाही सुरळीत चालेल, नसेल तर काहीही घडू शकते यात शंका नाही.
जसे मागील लेखात आपण पाहिले की वेगवेगळे सराव हे नित्यनियमितपणे चालू असतात. सरावातूनच नौसैनिक शेवटी एखाद्या गोष्टीवर प्रभुत्व मिळवितो. याशिवाय प्रत्येक विभागात आपापले आखलेले प्रशिक्षण वेळापत्रक हे असतेच.
बहुतेक सर्व युद्धनौकांवर, तिच्या आकारावर तसेच भूमिकेवर अवलंबून एक किंवा दोन हेलिकॉप्टर उतरविण्याची व्यवस्था असते. हे एक अत्यंत महत्त्वाचे साधन आहे. नौसेनेची बहुतेक हेलिकॉप्टर्स ही बहुउद्देशीय असतात. आक्रमण तसेच जीव वाचविण्यासाठी हेलिकॉप्टरचा उपयोग होतो. वैमानिकासाठी ही मोठी कसोटी असते. त्याची मुख्य कारणे म्हणजे युद्धनौका पुढे सरकत असते. समुद्राची उथळता, वार्‍याचा भडीमार या सर्वांबरोबर हेलिकॉप्टरला आपला वेग सांभाळत जहाजाच्या सतहावर उतरवावं लागतं.
या कार्याबाबत तीन गट भाग घेतात, ते म्हणजे, जमिनीवर स्थित हेलिकॉप्टर नियंत्रण कक्ष, समुद्रातील युद्धनौका व हेलिकॉप्टर. या तिघांचा ताळमेळ अतिमहत्त्वाची भूमिका बजावते. कोणा एकट्याच्या चुकीमुळे मनुष्य व यंत्रहानी होऊ शकते. सर्वप्रथम हेलिकॉप्टर कधी व कोणत्या ठिकाणी येणार याची कल्पना जहाजाला दिली जाते. यासाठी खास संचारव्यवस्था कार्यान्वित केली जाते. एक जबाबदार अधिकारी किंवा वरिष्ठ संदेशवाहक जहाजावर हे काम सांभाळतो. विमानतळाच्या नियंत्रण कक्षातून उड्डाणाची माहिती एकाच वेळेस हेलिकॉप्टर व जहाजाला दिली जाते. यातही जहाजाची व नियंत्रण कक्षाची आपापल्या जबाबदारीची सीमा ठरलेली असते. त्यामुळे अवास्तव गोंधळात टाकणार्‍या प्रकाराला आळा बसतो.
आता इकडे जहाजावर हेलिकॉप्टरला उतरवून स्वीकारण्याची तयारी सुरू होते. सर्वप्रथम जहाजाची जागा सांगण्यात येते, जेणेकरून हेलिकॉप्टर त्या दिशेने कूच करण्यास सुरुवात करते. ठराविक अंतरावर पोचल्यावर हेलिकॉप्टरचे नियंत्रण जहाजावर देण्यात येते. जहाजावर संचार व विमान या दोन्ही शाखा आता सक्रिय होतात. संदेशाची देवाण-घेवाण अतिजलद सुरू होते. हेलिकॉप्टर हाताळणार्‍यांना जहाजाच्या उद्घोषकावरून आदेश दिले जातात. त्याचबरोबर ध्वजसतहावरून हेलिकॉप्टर येणार याचे संकेत जहाजाच्या शिडावर, काही ठराविक उंचीवर ध्वज ङ्गडकावून दिले जातात. ध्वज किती उंचीवर ङ्गडकत आहे याचा एक सांकेतिक अर्थ ङ्गक्त वैमानिकाला व संदेशवाहकाला ठावूक असतो. त्याचे विवरण तो उपस्थित कप्तानाला देत असतो. ठराविक वेळेच्या अंतरावर जहाजाची गती, जहाजाची दिशा, जहाजावर वाहणार्‍या वार्‍याचा वेग, दिशा तसेच समुद्राची दशा ही सर्व माहिती वैमानिकाला वेळोवेळी दिली जाते. ही सर्व माहिती वैमानिकाला अत्यंत महत्त्वाची असते. या दिलेल्या माहितीवरच तो आपला निर्णय घेत असतो. ध्वजसतहावर संकेत-ध्वज पहिल्यांदा अर्ध्यावर चढविला जातो. याचा अर्थ असा होतो की हेलिकॉप्टरला स्वीकारण्याची तयारी चालू आहे. जेव्हा याची तयारी पूर्ण होते तेव्हा तो पूर्ण वर चढविला जातो. त्याचबरोबर बिनतारी संदेशाची देवाण-घेवाणही चालूच असते. ध्वज-संकेत देण्याचे कारण म्हणजे दळणवळण यंत्रणेत जर का कधी बिघाड झालाच तर याचा उपयोग हा महत्त्वाचा ठरतो.
त्याशिवाय ब्रिजच्या बाजूस असलेल्या मोकळ्या जागेतून दुर्बिणीतून हेलिकॉप्टरचा मागोवा घेतला जातो. कोणत्याही परिस्थितीत हेलिकॉप्टर जहाजाच्या दृष्टिपलीकडे जाणार नाही याची अतोनात काळजी घेतली जाते. स्वीकारण्याची तयारी होताच सर्वप्रथम संकेत-ध्वज वर चढविला जातो, सर्व आवश्यक सूचना तसेच माहिती वैमानिकाला व जहाजावरील विमान कक्षाला दिली जाते. इथे वैमानिकाची खरी कसोटी असते. लाटांमुळे वर-खाली होणारे जहाज, जहाजाचा वेग तसेच स्वतः हेलिकॉप्टरचा वेग या सगळ्यांचा ताळमेळ ठेवावा लागतो. एखादी चूक जीव व मालमत्ता गमाविण्यास भाग पाडू शकते. हेलिकॉप्टर जवळ दृष्टीस पडताच सगळे अगदी सतर्क होतात. आता काही काळ हा तणावपूर्ण असतो. वरील सगळी माहिती पुन्हा पुन्हा वैमानिकाला दिली जाते. जहाज एका दिशेला सरळ हाकले जाते. इकडे जहाजाच्या हेलोडेकवर (हेलिकॉप्टर उतरण्याची जागा) हेलिकॉप्टरला दिशा दर्शविणारा नौसैनिक लाल व हिरवा असे दोन लहान झेंडे घेऊन उभा असतो. त्याचबरोबर दिव्याद्वारेही उतरण्याचे संकेत दिले जातात. इथे हेलिकॉप्टरमध्ये उपस्थित असणारा विमान-गोताखोर वैमानिकाला जहाज व आपल्यातील अंतर हे वेळोवेळी सांगत असतो व योग्य त्या सूचनाही देत असतो. या गोताखोराची हेलिकॉप्टर युद्धनौकेवर उतरविताना वैमानिकाला ङ्गार मदत होते. ताशी वीस मैल चालत्या युद्धनौकेवर, छोट्याशा जागेत, हेलिकॉप्टर उतविणे म्हणजे हा साधा विषय नाही. याला भरपूर सराव तसेच तत्पर व अचूक निर्णय घेण्याची योग्यता लागते. जरुरी नाही की पहिल्याच वेळी हेलिकॉप्टर उतरता येईल. थोडी-बहुत शंका असेल तर ते पुन्हा वर उड्डाण भरून परत उतरण्यासाठी कूच करते. जेव्हा हेलिकॉप्टर सुखरूप उतरवून घेतले जाते तेव्हा त्यास साखळदंडांनी बांधले जाते अथवा त्याचा सतहावर स्थित हेलिकॉप्टर कक्षात पुढच्या उड्डाणापर्यंत सुरक्षित ठेवलं जातं. इकडे त्याचा अहवाल परत जमिनीवर स्थित नियंत्रण कक्षाला सोपविला जातो, जेणेकरून हेलिकॉप्टर सुरक्षित आहे हे समजलं जातं. यानंतर कप्तान, वैमानिक व इतर संलग्न अधिकार्‍यांचा जमावडा करून शाबासकी, चुका व दुरुस्ती यावर विश्लेषण केले जाते. कारण शेवटी सगळ्यांचा ताळमेळ हा महत्त्वाचा असतो. युद्धनौकेवर जर काही तात्पुरती दुरुस्तीची गरज असल्यास ती पूर्ण केली जाते. युद्धनौकेवर जेव्हा असे कार्य चालते तेव्हा सुरक्षितता हा महत्त्वाचा मुद्दा असतो.
हा सराव ङ्गार महत्त्वाचा आहे, कारण आपत्कालीन स्थितीत एखाद्या रुग्णास जलद स्थित्यंतर करण्यास हेलिकॉप्टरची ङ्गार मदत होते. अशाच प्रकारे सामानाची ने-आण करण्यासाठीशी याचा पुरेपूर उपयोग होतो. त्याशिवाय एका युद्धनौकेवरून दुसर्‍या युद्धनौकेवर उड्डाण भरण्याचा किंवा उतरण्याचा सराव करण्यात येतो. यामुळे वैमानिकाचा आत्मविश्वास वाढत जातो. याशिवाय नवख्या वैमानिकाला प्रशिक्षण देण्यासाठीही चालविण्याचा काळ वाढविला जातो.
एकूण युद्धनौकेवर हेलिकॉप्टर हाताळणे यात जोखीम, धैर्य व काहीतरी करायची धडपड ही शेवटी रंगरूपास येते. जेव्हा दररोज अशा प्रकारचा सराव केला जातो व तो यशस्वीपणे हाताळला होतो तेव्हा आनंदाला सीमा नसते.