न्यायालयामुळेच अधिवेशन : कामत

0
98

मडगावचे आमदार दिगंबर कामत म्हणाले की, मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर हे अधिवेशन घेण्याची गरजच नसल्याचे म्हणत होते. मात्र हे प्रकरण आता न्यायालयात गेल्यामुळे अधिवेशन घेतले जात असावे, अशी टिप्पणी त्यांनी केली.

ही तर थट्टाच : सरदेसाई
फातोर्ड्याचे अपक्ष आमदार विजय सरदेसाई म्हणाले की, आजचे एक दिवसाचे अधिवेशन म्हणजे थट्टाच असल्याचे सांगून आपणासह २० टक्के आमदार ह्या अधिवेशनात भाग घेणार नसल्याचे ते म्हणाले.
मधल्या काळात सरकारने काही महत्त्वाचे निर्णय घेतले. चीनच्या कंपनीला उद्योग उभारण्यासाठी जमीन देण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे सांगून एका दिवसात असा निर्णय घेता येत नसल्याचे ते म्हणाले. विरोधकांनी त्यासंबंधी आवाज उठवायला हवा होता असे सरदेसाई म्हणाले.
सरकारचा मनमानी कारभार : सावळ
अपक्ष आमदार नरेश सावळ म्हणाले की हे सरकार मनमानीपणे काम करत आहे. म्हणूनच त्यांनी सहा महिन्यापर्यंत अधिवेशन बोलावले नसल्याचे ते म्हणाले. आज होणारे अधिवेशन घेण्याची गरज नाही असे मुख्यमंत्रीच सांगत होते, असे ते पुढे म्हणाले.