पणजीत चारशे किलो भेसळ खाद्यपदार्थ जप्त

0
101

>> लाखाभराचा माल; अन्न-औषध प्रशासनाची कारवाई

 

आरोग्यासाठी घातक असा रंग वापरून तयार करण्यात आलेले विविध प्रकारचे ४०० किलो पाकिटबंद भेसळ खाद्यपदार्थ काल अन्न आणि औषध प्रशासनाने येथील मांडवी पुलाजवळ जप्त केले. जप्त केलेल्या मालाची किंमत १०९,७१० रु. एवढी असल्याची माहिती एफडीएचे संचालक सलीम वेलजी यांनी दिली.
औरंगाबाद येथील नॅचरल ङ्गूड प्रॉडक्ट्‌स या कंपनीने पाठवलेला हा माल मांडवी पुलाजवळ पावलो बसमधून ताब्यात घेण्यात आला. ताब्यात घेण्यात आलेल्या खाद्य पदार्थांमध्ये चिप्स, चिवडा, सामोसा, टॉमेटो स्टिक्स, सेझवान स्टिक्स, सोया पापडी आदी प्रकारच्या खाद्यपदार्थांचा समावेश आहे. या खाद्यपदार्थांच्या पाकिटांवर आत असलेल्या खाद्य पदार्थांसंबंधीचे तपशील देणारी लेबल्सही लावण्यात आली नव्हती असे अन्न आणि औषध प्रशासनाचे संचालक वेलजी यांनी सांगितले.
हा माल मडगाव येथील अमित मिश्रा
नामक व्यक्तीने मागवला होता. खास कार्निव्हल महोत्सव लक्षात घेऊन तो आणण्यात आला होता, असे वेलजी म्हणाले. अन्न आणि औषध प्रशासनाने संपूर्ण माल ताब्यात घेऊन तो नष्ट केला. अन्न सुरक्षा व प्रमाण कायदा २००६ खाली वरील कंपनी तसेच विक्रेता अमित मिश्रा यांच्यावर गुन्हा नोंदवण्यात आला
आहे.
ही कारवाई अन्न आणि औषध प्रशासनाचे वरिष्ठ अन्न आणि सुरक्षा अधिकारी राजीव कोरडे यांच्या मार्गदर्शनाखाली अमित मांद्रेकर, सुजाता शेटगावकर, स्नेहा सावंत, झेनिया रोझारियो व ऍटेन्डंट अर्जुन नाईक यांनी वरील कारवाई केली.