११२ फुटी शिवप्रतिमेचे कोईम्बतुर येथे उद्घाटन

0
133

येथील ईशा योग केंद्रात शंकराच्या ११२ फूट उंच मूर्तीचे उद्घाटन महाशिवरात्रीच्या शुभमुहूर्तावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते काल करण्यात आले. ही मूर्ती ईशा फाउंडेशनचे संस्थापक सद्गुरू जग्गी यांनी डिझाईन केली असून ‘आदियोगी’ असे या शिवप्रतिमेचे नाव आहे.

ही शिवप्रतिमा बनवण्यासाठी ८ महिन्यांचा कालावधी लागला आहे. हा पुतळा स्टीलचा असून सुमारे ५०० किलो स्टीलचा वापर ही प्रतिमा तयार करण्यासाठी करण्यात आला आहे. या पुतळ्याचे आरेखन करण्यासाठी अडीच वर्षांचा कालावधी लागला आहे.
काल सायंकाळी मंत्रोच्चाराच्या जयघोषात मूर्तीचे मोदींच्या हस्ते उद्घाटन झाले. यावेळी बोलताना मोदी यांनी ही प्रतिमा पुढील अनेक पिढ्यांना योगासाठी व शिवमय होण्यासाठी प्रेरणा देत राहील असे सांगितले. सोहळ्याला तामिळनाडूचे राज्यपाल सी. विद्यासागर राव, मुख्यमंत्री इ. पलनीस्वामी आदी महनीय उपस्थित होते.